नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नवापूर अंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी संबंधित महसुली गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून 25 जून 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

वाकीपाडा, नांदवण, बोरझर, लक्कडकोट (सरपंचफळी), ढोरपाडा, वागदा, वाघाळापाडा येथील अंगणवाडी केंद्रातील 7 अंगणवाडी सेविका रिक्त पदासाठी तर घाटाफळी (मिनी) अंगणवाडी केंद्रातील 1 मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदासाठी अर्ज  मागविण्यात आले आहेत.

तसेच भवरे, आंबाफळी, बेडकीपाडा, जामतलाव, देवलीपाडा, दुधवा-1, कोळदा-1, पिंप्राण, मोहनपाडा, खोकसा, पूर्व बोरचक, पश्चिम बोरचक, पाटी-1, पाटी-3, बेडकी, चिंचपाडा-3, तारापूर-1, मेंदीपाडा, खांडबारा-3, हनुमंतपाडा, घोगळपाडा-2, नांदवण, वडदा अंगणवाडी केंद्रातील मदतनीस या 23 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी  केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, नवापूर पंचायत समिती ता.नवापूर येथे संपर्क साधावा.