नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शहादा अंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी संबंधित महसुली गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून 25 जून 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

धांद्रे बु, टेंभली-1, बोराळा-1, बामखेडा-1 येथील अंगणवाडी केंद्रातील 4 अंगणवाडी सेविका रिक्त पदासाठी अर्ज  मागविण्यात आले आहेत.

तसेच धांद्रे खु, पुसनद-1, खापरखेडा-1, बोराळा-1, बामखेडा-1,  मोहिदा, कहाटुळ 1,2,4, डोगरगाव 5,3, लोणखेडा-5, जयनगर-3, कोठली-3, हिंगणी, अनरद-1, नांदर्डे, कर्जोत-1, पिंपर्डे-1, लोहारा, न्यु असलोद-1, असलोद, टेंभा-1, कुकावल-1, काकर्दे खुर्द, अंगणवाडी केंद्रातील मदतनीस या 25 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी  केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,शहादा पंचायत समिती ता.शहादा येथे संपर्क साधावा.