नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय प्रशिक्षण संस्था, वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच ज्यांची सेवा 20 पेक्षा जास्त बेड्स आहे अशा खाजगी दवाखान्यांची ग्रीन चॅनेलद्वारे व्यवसायीक प्रशिक्षण संस्था म्हणून नोंदणी करुन बेरोजगार उमेदवारांना आरोग्य व नर्सिंग क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीसाठी उमेदवारांनी  नंदुरबार स्कील (Nandurbar Skill) या फेसबुकवर गुगल फॉर्मद्वारे माहिती भरावी. जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींनी आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी नोंदणी  करावी आणि अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार  (02564-295801) येथे संपर्क साधावा असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, सहायक आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.