नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तळोदा अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी संबंधित महसुली गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून 30 जून 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

लाखापूर रेव्हन्यू, कळमसरे, चिनिपाणी, प्रतापपुर-5, चिनोदा-1, गाढवली, अलवान, आमलाड-1, सोमावल खुर्द-2, शिर्वे-1,‍ पिंपरपाडा-1, अंम्मलपाडा-1, रामपूर-1, बंधारा, मोहिदा-1, काझीपुर, मोहिदा-2, चौगाव बुद्रुक-1, बेलीपाडा-1  येथील अंगणवाडी केंद्रातील 19 अंगणवाडी सेविकांच्या रिक्त पदासाठी अर्ज  मागविण्यात आले आहेत.

तसेच तुळाजा-1, लाखापुर-1, खरवड-2, खेडले, कढेल, मोड-1, मोड-3 (आष्टे), गुंजाळी, मोहिदा-2, न्यूबन-1, प्रतापपुर-1, प्रतापपुर-2, प्रतापपुर-3, काझीपुर, खर्डी खुर्द, केलीपाणी, बेलीपाडा-1, शिर्वे-1, शिर्वे-2, ढेकाटी, राणीपुर-3, चिनोदा-4, काकलपुर, राणापुर, चौगाव खुर्द, कालीबेल-2, मेंढवड अंगणवाडी केंद्रातील मदतनीसाच्या 27 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी  केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा  पंचायत समिती ता.तळोदा येथे संपर्क साधावा.