नंदुरबार (जिमाका वृत्त) – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिजामाता शिक्षण संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 28 डिसेंबर, 2023 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कुल जिजामाता महाविद्यालय शेजारी, नंदुरबार येथे सकाळी 10 वाजता होणाऱ्या या मेळाव्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.  नोंदणी न केलेल्यांनी शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल.  तो वापरुन पोर्टलवर लॉगिन करावे, त्यानंतर आपल्या नोंदणीच्या माहितीतील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर मधील दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील नंदुरबार जिल्हा निवडून त्यातील रोजगाराची माहिती पहावी व रिक्तपदांची माहिती पाहून नोंदणी करावी.  त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होईल.

याबाबत काही मदत आणि माहितीसाठी कार्यालयाच्या 02564-295805 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.  या मेळाव्याचा इच्छुक उद्योजक आणि बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.