Category: इतर

नगराध्यक्षा रत्ना रघुवंशींना पितृशोक

 नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील रघुवंशी समाजाचे ज्येष्ठ नागरिक गजेंद्रसिंह  गोविंदसिंग उर्फ गजू काका हजारी (वय८५)  यांचे बुधवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी पहाटे ४:३० वाजता अल्पशा आजाराने  सुरत येथे उपचार सुरू असताना निधन झाले.  त्यांच्या पश्चात  पत्नी, एक मुलगा, सुन, ४ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. रत्नाभाभी रघुवंशी आणि यशवंत विद्यालयाचे प्रा. अरुण हजारी यांचे वडील तसेच जेष्ठ विधीज्ञ ॲड . राजेंद्र रघुवंशी, माजी आमदार व शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, नगरसेवक अमित रघुवंशी, लायन्स क्लबचे  माजी अध्यक्ष आनंद रघुवंशी यांचे ते सासरे होते. ॲड . रोहित अरूणसिंह हजारी यांचे ते आजोबा होते. कै. गजूकाका हजारी यांच्या पार्थिवावर सुरत येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत...

Read More

टपाल विभागातर्फे बंद जीवन विमा पॉलिसी सुरू करण्याची संधी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सतत पाच वर्षे भरणा न केल्यामुळे बंद डाक विमा पॉलिसींचे पुनरुज्जीवन करण्याची संधी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर या पॉलिसींचे पुनरुज्जीवन करण्यात येणार नाही. यासाठी पॉलिसीधारकाच्या चांगल्या आरोग्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता राहील. पॉलिसीधारकांनी अधिक माहितीसाठी जवळच्या टपाल कार्यालयात किंवा टोल फ्री क्रमांक 18001805232 वर संपर्क साधावा, असे प्रवर अधीक्षक प्रतापराव सोनवणे यांनी कळविले...

Read More

धनगर प्रवर्गातील नागरिकांसाठी ग्रामीण भागात घरकूल योजना

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील ग्रामीण भागातील विकासापासून दूर असलेल्या विमुक्त जाती, भटक्या धनगर प्रवर्गातील समाजाच्या नागरिकांसाठी ग्रामीण भागात घरकुल योजना राबविण्यात येत आहे.             ही योजना वैयक्तीक सामुहिक लाभाची आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या धरतीवर ग्रामीण क्षेत्रात वास्तव्य करीत असलेल्या व मागील किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असलेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या बेघर कुटुंबांना घरकूल बांधून देण्यासाठी ही योजना आहे.             या योजनेच्या लाभासाठी पात्रताधारक लाभार्थ्यांनी अटी शर्तींच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन टोकरतलावरोड नंदुरबार येथे सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राकेश महाजन यांनी केले...

Read More

राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात पाणीसाठ्याचे पुनरुज्जीवन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 1263 पाणी साठ्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून 86 कामे प्रस्तावीत करण्यात आली आहेत. नवे जलस्त्रोत विकसीत करण्यात व त्याद्वारे पाणीसाठा करण्यात येणाऱ्या अडचणी  लक्षात घेता अस्तित्वात असलेल्या पाणीसाठ्याचे पुनरुज्जीवन करून पाणीसाठ्याची क्षमता वाढविण्याचे निर्देश राष्ट्रीय हरीत लवादाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात पुनरुज्जीवन झालेल्या कामांची माहिती संकलीत करण्यात आली व काही नवी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. कृषी विभागातर्फे 1032 कामे करण्यात आली  आहेत. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातर्फे 221 कामे करण्यात आली असून 77 काम प्रस्तावित करण्यात आली आहेत. नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागातर्फे 6 कामे करण्यात आली असून 9 नवीन कामे प्रस्तावित करण्यात आली आहे, तर मृद व जलसंधारण विभागातर्फे 4 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. प्रत्येक गावात किमान पाणीसाठा पुनरुज्जीवनाचे एक काम करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी  दिले आहे. पुनरुज्जीवन कामामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन त्याचा लाभ ग्रामीण जनतेला होणार...

Read More

संचार बंदी काळात दूध विक्रेत्यांना पेट्रोल भरण्याची मुभा देण्याची मागणी

 नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनातर्फे जारी करण्यात आलेल्या आठ दिवसाच्या  कडक संचारबंदी काळात दूध  विक्रेत्यांना आपल्या वाहनात पेट्रोल भरण्याची मुभा देण्याची मागणी  जिल्ह्यातील दूध व्यावसायिक वाहनधारकांनी केली आहे.  यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनातर्फे दिनांक 22 ते 30 जुलै पर्यंत नंदुरबार सह शहादा तळोदा आणि नवापूर या शहरांमध्ये कडक संचारबंदी जारी करण्यात आली आहे . यात वृत्तपत्रे आणि दूध विक्रेत्यांना सूट देण्यात आली त्याबद्दल प्रशासनाचे दूध व्यवसायिकांनी  आभार मानले आहे.  परंतु जारी केलेल्या आदेशात संचार बंदी काळात केवळ कोरोना विषयी कामकाज करणारे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनाच पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचे  आदेशात नमूद केले आहे. जीवनावश्यक बाब म्हणून दूध विक्रेते वाहनधारकांना  इंधनाची गरज असते.  याबाबत संबंधित  पेट्रोल पंप चालकांना  दूध व्यवसायिक  वाहनधारकांना  पेट्रोल भरून देण्याबाबतच्या सूचना करण्यात याव्यात. जिल्ह्य़ातील सर्व दुध विक्रेत्यांना आपल्या वाहनात पेट्रोल भरण्याची मुभा देण्याची मागणी  जिल्ह्यातील सर्व दूध व्यवसायिक वाहनधारकांतरफे विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल भटू लगडे तसेच गवळी समाज महासंघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी निवेदनाद्वारे केली...

Read More

पत्रकारांनी आपली शक्ती अडचणीतील लोकांसाठी वापरावी- प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे

नंदुरबार(प्रतिनिधी)-लोकशाहीचा प्रसार माध्यम चौथा स्तंभ असल्याने पत्रकारांनी आपली शक्ती अडचणीतील लोकांसाठी वापरावी. पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य पत्रकार संघ सर्वतोपरी मदत करेल. कोरोनाच्या काळात माध्यम क्षेत्रावरही मोठे संकट ओढावल्याने आपल्यातील कोणी पत्रकार अडचणीत असेल तर त्याची अडचण सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. तर पत्रकार संघाच्या पाठपुराव्यानंतर कोरोना काळात आरोग्य व पोलिस कर्मचार्‍यांबरोबर पत्रकारांनाही विमा संरक्षण सरकारने दिले असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.  नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा व तालुका पदाधिकार्‍यांशी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शुक्रवार दि. 10 जुलै रोजी वेब संवाद करत समस्या जाणून घेतल्या. राज्यात कोरोनाचे थैमान सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वसंत मुंडे हे प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधत संकटाच्या काळात धैर्याने लढण्याचा आणि अडचणीतील लोकांना मदत करत आपल्या सहकार्‍यांना साथ देण्याचा विश्‍वास निर्माण करत आहेत. लोकशाहीत प्रसार माध्यम चौथा स्तंभ असल्याने पत्रकारांनी आपली क्षमता अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी वापरावी. उद्योग धंदे बंद झाल्याने विभागीय आणि जिल्हास्तरावरील दैनिकांचे प्रकाशन बंद पडल्याने पत्रकारांसह हजारो लोकांवर बेरोजगारीचे व आर्थिक संकट ओढावले आहे. अशा काळात पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी आपली क्षमता वापरुन अडचणीत असलेल्या आपल्या क्षेत्रातील सर्व घटकातील लोकांना मदत करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहन केले. राज्यभरात पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी अडचणीतील सहकार्‍यांना साथ देण्याची भूमिका घेतल्याचे अनेक ठिकाणचे दाखलेही त्यांनी दिले. तर कोरोनाच्या काळात राज्य सरकारने आरोग्य व पोलिस कर्मचार्‍यांना पन्नास लाखाचे विमा कवच जाहीर केल्यानंतर राज्य मराठी पत्रकार संघाने लोकात जावून काम करणार्‍या आणि शासन व प्रशासनाला वस्तुस्थितीची जाणीव करुन देणार्‍या पत्रकारांनाही विमा...

Read More

श्रीमती सूलभा पवार यांची निवड

शहादा (प्रतिनिधी):- येथील सक्षम टाईम्स च्या प्रतिनिधी  श्रीमती  सुलभा पवार यांची महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे नंदुबार जिल्हा अध्यक्ष  शरद मराठे, विजय सुर्यवंशी यांनी ही निवड नुकतीच जाहीर केली आहे. पत्रकारितेत आपल्या धङाङीने व कार्यकुशलतेने स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या तसेच प्रत्येकाशी हसतमुख व विनम्रतेने वागून माणसं कमावण्याची कला अवगत असणा-या सुलभा पवार यांना पुढील वाटचालीसाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या...

Read More

प्रेम विवाह प्रकरण; ७ जणांना सश्रम कारावास

नंदुरबार:-  तळोदा येथील प्रेमविवाह प्रकरणातून तरुणाला मारहाण करणाऱ्या नातलगांना न्यायालयाने सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत प्राप्त माहितेनुसार या घटनेतील दुखापत झालेल्या तरुणाने आरोपी परिवारातील मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर आरोपी व दुखापती तरुण यांचे परीवारातील सदस्यांमध्ये जातीरीतीरीवाजाप्रमाणे बैठक बसवुन तंटा आपसात मिटवुन घेण्यात आला होता व मुलीस तिचे वडील यांचेकडे सोपविले होते. दरम्यान आरोपी हे संबंधित तरुणाला वारंवर जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यातच दि .०५  मे २००७ रोजी सकाळी ११.३० वाजताचे सुमारास तळोदा गावात साजन टेलर्स या दुकानासमोर अलीम मलिक हुसेन, सोहेब मलिक हुसैन सुलतान, मलक नईम मलक अफजल ( मयत ), मलक विकार मलक रहेमान, मलक रहीम मलक हुसेन, मलक सुलतान मलक हुसेन, मलक हसीम मलक अफजल आणि अहमदखान रहेमानखान पिंजारी सर्व रा . मलकवाडा तळोदा जि.नंदुरबार या सर्वांनी हातात लाकडी डेंगारे , लाठया काठया व लोखंडी चैन घेवुन अनिस ईस्माइल बागवान याने आपल्या मुलीसोबत प्रेम विवाह केल्याच्या रागातुन मारहाण केली होती. यात अनिस यांचे डोके फुटुन तो रक्तबंबाळ झाला होता. नंतर जखमी अनिस यास काही लोकांनी आरोपीतांच्या तावडीतुन सोडवुन त्यास उपचारकामी दवाखान्यात दाखल केले होते. याप्रकरणी अनिस याचा भाऊ रईस ईस्माइल बागवान याच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.   सदर खटल्याची सुनावणी  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री . एस . डी . हरगुडे यांच्या कोर्टात होवून आरोपी यांचेविरुध्द गुन्हा शाबित होवुन आरोपी क्र .३ मयत झाल्याने उर्वरित आरोपी क्र. १ ते २ व ४ ते ८ यांना न्यायालयाने ६ महिने...

Read More

गावातील जलसाठ्याचे पुर्नजीवन करा- डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय हरित लवादाने प्रत्येक गावात एक तळे, गाव तलाव, पाझर तलाव, यासारख्या जलसाठ्याचे पुर्नजीवन करण्याचे आदेश दिले असल्याने गावात अस्थित्वात असलेल्या एका जलसाठ्याचे पुर्नजीवन करावे, पुर्नजीवनाचे काम झाले असल्यास  त्याची माहिती त्वरीत सादर करावी. असे प्रतीपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित हरित लवादा संदर्भातील बैठकीत ते बोलत होते,बैठकीत अपर जिल्हाधिकारी महेश पाटील,उपजिल्हाधिकारी बबन काकडे,सुदीर खांदे,उपवनसरंक्षक सुरेश केवटे, आदि उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आणि भूजल पातळी कायम ठेवण्यासाठी ही कामे महत्वाची आहे. जलयुक्त शिवार, लोकसहभाग,आणि मनरेगाच्या माध्यमातुन अशी कामे जिल्ह्यात झाली आहेत. एखाद्या गावात झाली नसल्यास ती मनरेगा आणि लोकसहभागाच्या माध्यमातुन करण्यात यावीत. झालेल्या सर्व कामाची माहिती त्वरीत सादर करावीत असे त्यांनी सांगितले. श्री.काकडे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून हरित लवादाच्या निर्देशाची माहिती...

Read More

कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

नंदुरबार (प्रतिनिधी)- गेल्या 15 वर्षापासुन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करीत असुन शासकीय सेवेत सामवुन घेण्यासाठी कंत्राटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. सद्या कोरोना महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता एनएचएम कर्मचार्‍यांनी रुग्ण सेवेत झोकुन दिले आहे. मात्र कंत्राटी कर्मचार्‍यांबद्दल शासनाची भुमिका उदासिन आहे. यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फत आंदोलन करण्यात आले आहे. कोरोनाचा संकटात माघार न घेता एनएचएम कर्मचार्‍यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालुन अखंडपणे रुग्णसेवा सुरु ठेवली आहे. परंतु कोरोनाच्या रुग्णावर उपचार करीत असतांना मास्क, ग्लोज, सॅनिटाईझर व आवश्यक ती सुरक्षेतची साधने उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. परंतु असे असतांनाही त्यासाठी या कर्मचार्‍यांना काळ्याफिती लावुन आंदोलन करावे लागत आहे. त्यावरही या आरोग्य कर्मचार्‍यांच्या मागण्याची दखल घेतली जात नाही. या कर्मचार्‍यांचा सेवागाळ 15 वर्षापासुन अधिक झाला आहे. तरी देखील शासनाने त्यांचे शासकीय सेवेत समायोजन केलेले नाही. त्यांना अद्याप अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. तुलनेने नव्याने झालेल्या कंत्राटी भरतीतील कर्मचार्‍यांनाही त्यांच्या पेक्षा अधिक मानधन देण्यात येते. परंतु याच कोरोना योध्दांची सरकारकडुन दखल घेतली जात नाही. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यामुळे काल 11 जुन पासुन बेमुदत कामबंद राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय राज्यस्तरीय समन्वय समितीने घेतला आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फत पालकमंत्री ना.अ‍ॅड.के.सी.पाडवी, खा.डॉ.हिना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.राजेश पाडवी, आ.शिरीष नाईक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले...

Read More

अखेर नगरसेवक खान विरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार दि.11 : जिल्ह्यातील संचारबंदी आदेश आणि साथ रोग प्रतिबंधक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल नंदुरबार येथील परवेजभाई करामतभाई खान यांच्याविरुद्ध तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. परवेज खान यांनी 30 जून 2020 पर्यंत मनाई आदेश लागू असताना सदर आदेशाचा भंग करून मौजे झराळी येथील फार्म हाऊसवर मुलाच्या लग्न समारंभानिमित्त स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास 50 व्यक्तिंची परवानगी असताना  त्यापेक्षा अधिक व्यक्तिंना आमंत्रित करण्यात आले होते. अशाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धेाका असल्याने आणि संसर्गजन्य आजार पसरून मानवी जिवीतास धोका उत्पन्न होण्याची ही कृती असल्याने प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन तहसीलदार थोरात यांनी भारतीय दंड संहितेचे कलम 188, 268, 269, 290, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 54 आणि साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 नुसार हा गुन्हा दाखल केला आहे. स्नेहभोजन प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भारुड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक नंदुबार यांची संयुक्त समिती नेमण्यात आली होती.जिल्ह्यात कोविड-19 च्या संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण असल्याने संचारबंदीत शिथीलता देण्यात आली आहे. त्याचा उपयोग केवळ अत्यावश्यक बाबींसाठी नागरिकांनी करावा. कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात होणार नाही यासाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक व्यक्तिंना आमंत्रित करू नये. रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीत घराबाहेर अनावश्यक फिरू नये. बाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क घालावा आणि शारिरीक अंतराचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले...

Read More

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनाच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाने सन 2019 मधील तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार (TNNAA) प्रदान करण्यासाठी  खेळाडूंनी 20 जून पर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. पुरस्कारासाठी नामांकन सादर करणाऱ्या खेळांडूची कामगिरी सन 2017, 2018, 2019 या तीन वर्षातील असणे आवश्यक आहे. साहसी उपक्रम हे जमीन,पाणी, व हवेमधील असणे आवश्यक राहील. खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ट असावी. पुरस्काराबाबत अधिक माहिती व अर्ज करीता https:dbtyas-youth.gov.in  या संकेतस्थळावर 20 जून 2020 पर्यंत प्रस्ताव सादर करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रिडा अधिकारी, साक्री नाका, खामगाव रोड, नंदुरबार येथे 10 जून 2020 पर्यंत संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले...

Read More
Loading

सुंदर विचार

☘☘

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – ११०२ 〇 🎵
═══════ 🦋;🦋 ═══════

प्रत्येक सकाळ म्हणजे
भूतकाळाच्या वलयातुन
बाहेर येऊन ,
भविष्य सुंदर करण्याची
सुवर्णसंधी होय !

➖➖➖➖➖➖➖➖➖
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
गर्दी टाळा, नियम पाळा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
६ ऑगस्ट
जागतिक
अण्वस्त्रविरोधी दिन !
अणुशस्त्र जागृती दिन !
१९२५: लेखिका
योगिनी जोगळेकर,
(मृत्यू: १ नोव्हेंबर २००५)
१९५९: पर्यावरणवादी
राजेंद्र सिंग,
१९६५: दिग्दर्शक
विशाल भारद्वाज,
१९७०: निर्माते, दिग्दर्शक
एम. नाईट श्यामलन,
यांचा जन्मदिवस !
१९२५: काँग्रेसचे एक
संस्थापक , राष्ट्रगुरू
सुरेंद्रनाथ बॅनर्जी,
(जन्म: १० नोव्हेंबर १८४८)
१९६५: संगीतकार
वसंत पवार,
१९९७: साहित्यिक
वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य,
(जन्म: १४ ऑक्टोबर १९२४)
१९९९: काँग्रेसचे नेते
कल्पनाथ राय,
(जन्म: ४ जानेवारी १९४१)
२००१: नौदल प्रमुख
आधार कुमार चॅटर्जी,
२०१९: भाजपा नेत्या
सुषमा स्वराज
(जन्म: १४ फेब्रुवारी १९५२)
यांचा स्मृतिदिन !_
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0029640
Visit Today : 28
error: Content is protected !!