Author: Ramchandra Bari

अल्पसंख्याक कल्याणासाठी जिल्हास्तरीय समितीसाठी नांवे पाठवावित – सुधीर खांदे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) – अल्पसंख्याक कल्याणासाठी प्रधानमंत्री नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची पुनर्रचना करावयाची असून ग्रामीण व नागरी क्षेत्रातील अल्पसंख्याक कल्याणाशी संबंधित स्थानिक पंचायतराज संस्थांचे प्रतिनिधी, तसेच जिल्ह्यातील अल्पसंख्यांकासाठी काम करणाऱ्या 3 नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांची नांवे 9 ऑक्टोंबर 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले...

Read More

मध विक्रीसाठी नांव नोंदणी करावी – विजय चाटी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध विक्रीसाठी जिल्ह्यातील महिला बचत गट, स्वयंसेवी संस्थां, दुकानदार, व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, ठोक विक्रेते, व किरकोळ विक्रेते यांनी महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयात नांव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी  विजय चाटी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालयामार्फत मधुबन हनी ब्रॅण्ड अंतर्गत 100 टक्के शुध्द व ऑरगॅनिक मध तयार केले जात असून सदर मध विक्रीसाठी जिल्ह्यातील वितरक म्हणुन नेमणुक करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती मान्य असल्याबाबतचा सामंजस्य करारनामा रुपये 100 च्या स्टॅंम्पपेपरवर मंडळाचे विहित नमुन्यात करून देणे आवश्यक आहे. वितरक ठोक विक्रेते यांना 25 टक्के कमिशन व किरकोळ विक्रेते यांना 20 टक्के कमिशन मंडळामार्फत देण्यात येईल. या संधीचा फायदा जिल्ह्यातील महिला बचत गट, स्वयंसेवी संस्थां, दुकानदार, व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, ठोक विक्रेते, व किरकोळ विक्रेते यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. 5, महाबळेश्वर जि. सातारा पिनकोड 412 806 या कार्यालयाच्या 02168-260264  दूरध्वनी क्रमांकावर तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, प्रशासकीय ईमारत जिल्हाधिकारी कार्यालय गाळा क्र. 222, नंदुरबार या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02564-210053 क्रमांकावर किंवा मध प्रशिक्षित कर्मचारी योगेश बदान यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9379965964 यावर संपर्क साधावा असेही  श्री. चाटी यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले...

Read More

रामभक्तांच्या प्रयत्नांनी सुखरूप आलो, मालसर येथे अडकलेल्या भाविकांनी केले अनुभव कथन

नंदुरबार (प्रतिनिधी) :- भगवंत आणि संत दगाजी बापू यांच्या आशीर्वादाने आणि सर्व रामभक्तांच्या प्रयत्नांनी आम्ही प्रचंड मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर आलो. ज्या ज्या रामभक्तांनी या संकट काळात आम्हाला मदत केली, त्या सर्वांचे शतशः आभार, अशी प्रतिक्रिया मालसर, जि. बडोदा येथे रामधून कार्यक्रमासाठी गेलेल्या भक्तांनी दिली. नर्मदेच्या पुरात अडकलेले भाविक श्री वाल्मीक तांबोळी व श्री भरत पटेल यांनी याबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, गेल्या 38 वर्षापासून चौपाळा येथील प. पू. ब्रम्ह. संत दगाजी महाराज यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली अखंड रामधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच प्रेरणेतून दरवर्षी श्रावण महिन्यात विविध तीर्थक्षेत्रांवर जाऊन राम व श्रीकृष्णाच्या नामजपाचा कार्यक्रम चौपाळा येथील...

Read More

विसरवाडी येथे पाककला स्पर्धा संपन्न

नंदुरबार (प्रतिनिधी):- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा सार्वजनिक हायस्कूल विसरवाडी येथे आयोजित करण्यात आली होती.नवापूर पंचायत समितीचे उपसभस्पती श्री शिवाजी गावित यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री. आर. बी. चौरे, विस्तार अधिकारी श्री रमेश देसले,श्री शीलवंत वाकोडे, केंद्रप्रमुख विसरवाडी श्री पवार, केंद्रप्रमुख खांडबारा श्री सुनील सोनवणे, केंद्रप्रमुख श्रावणी श्री महेंद्र नाईक हे उपस्थित होते.निरीक्षक म्हणून श्रीमती पोर्णिमा, सारिका, फॅमिली गावित यांनी काम पाहिले. केंद्रातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर यात सहभाग...

Read More

16 ऑक्टोबरपर्यंत राबविणार ‘सेवा महिना’; विशेष मोहिमांसह लोकाभिमुख उपक्रमांची करणार अंमलबजावणी – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार : (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यात 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत सेवा महिना राबविण्यात येणार असून, या ‘सेवा महिना’ कालावधीत  विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी व अंमलबजावणी  केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. दिली आहे. राज्य शासनाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना माहिती प्राप्त करून देणे, नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी महिनाभर सेवा महिना हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र, सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे, असे श्रीमती खत्री यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे. पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा,...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!