नंदुरबार (प्रतिनिधी):- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा सार्वजनिक हायस्कूल विसरवाडी येथे आयोजित करण्यात आली होती.
नवापूर पंचायत समितीचे उपसभस्पती श्री शिवाजी गावित यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री. आर. बी. चौरे, विस्तार अधिकारी श्री रमेश देसले,
श्री शीलवंत वाकोडे, केंद्रप्रमुख विसरवाडी श्री पवार, केंद्रप्रमुख खांडबारा श्री सुनील सोनवणे, केंद्रप्रमुख श्रावणी श्री महेंद्र नाईक हे उपस्थित होते.
निरीक्षक म्हणून श्रीमती पोर्णिमा, सारिका, फॅमिली गावित यांनी काम पाहिले. केंद्रातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर यात सहभाग नोंदवला.