Author: Ramchandra Bari

जिल्ह्यात 28 ऑगस्ट रोजी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी 28 ऑगस्ट 2020 रोजी गणेश विसर्जनाच्या 7 व्या दिवशी संपूर्ण दिवस किरकोळ मद्य विक्री करणाऱ्या एफएल-2, एफएल-3, सीएल-3,सीएल/एफएल/टीओडी-3 आणि एफएल/बीआर-2 अशा सर्व अनुज्ञप्त्या बंद करण्याचे आदेशित केले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अपूर्ण कामे त्वरीत पुर्ण करा – डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत गतवर्षीची प्रलंबित कामे त्वरीत पुर्ण करून त्याबाबत अहवाल त्वरीत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी  दिले. जिल्हा वार्षिंक योजना सर्वसाधारण,आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना सन 2019-2020 मध्ये वितरीत केलेल्या निधीचा खर्च व कामाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी  राहुल पवार, उपवनसंरक्षक सुरेश केवटे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य, रस्ते, बांधकाम, कृषी, जिल्हा परिषद आदी विविध यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. पूर्ण झालेल्या कामावरील खर्च व उपयोगिता प्रमाणपत्र तसेच खर्च ताळमेळ अहवाल, कामाचा तपशिल त्वरीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले. राज्यात कोरोना विषाणूमुळे साथीच्या परिस्थितीमुळे शासनाने जिल्हा वार्षिक योजनातंर्गत सन 2020-2021 या आर्थिक वर्षांत मुळ अर्थसंकल्पित तरतुदीच्या 33 टक्के निधी वितरीत करण्यात येणार असून या निधीतुन 25 टक्के निधी कोविड-19 व आरोग्य विषयक कामावर खर्च करण्याचे निर्देश आहेत. प्राप्त निधीच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम पाहून इतर विभागांना त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी निधी वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार निधीची मागणी विभाग प्रमुखांनी करावी. कोविड-19 परिस्थितीत आरोग्य विभाग तसेच अत्यावश्यक बाबी वगळता नवीन कामे प्रस्तावीत करु नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सन 2019-20 मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण योजना ) अंतर्गत 112 कोटी निधी मंजूर झाला होता.त्यापैकी 110 कोटी 9 लाख निधी खर्च करण्यात आला आहे. तर आदिवासी उपयोजना (टी.एस.पी )...

Read More

सुसरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन

नंदुरबार दि. 24: जिल्ह्यात होणाऱ्या सध्याचे पर्जन्यमान पाहता व नदीतील पाण्याचा विसर्ग लक्षात घेता शहादा तालुक्यातील सुसरी प्रकल्पातून आज संध्याकाळी 5 वाजता सुसरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे. नदीकाठावरील टेंभली, लोणखेडा,मलोणी, उंटावद, तिखोरा, शहादा, पिंगाणे, धुरखेडा, मनरद, करझई, डामरखेड, लांबोरा या गावांतील नागरीकांनी दक्षता घ्यावी व नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. तलाठी, ग्रामसेवक,मंडळ अधिकारी यांनी मुख्यालय सोडु...

Read More

महिला व बालविकास भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांच्या हस्ते जिल्हा परिषद परिसरातील महिला व बालविकास भवनाचे उद्घाटन करण्यात आले.  जिल्हा  महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषदेचा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ यांची कार्यालये एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देणे सोईचे होण्यासाठी हे भवन कार्यान्वित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी बापूराव भवाने यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले व भवनाविषयी माहिती दिली. यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी,...

Read More

जिल्ह्यातुन कुपोषणाला हद्दपार करणार – ॲड. के.सी.पाडवी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कायमचे दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल आणि त्यासाठी महिला रुग्णालय उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. महिला रुग्णालय आणि  आरपीटीपीसीआर लॅबच्या उद्घाटन  प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, खासदार डॉ.हीना गावीत, आमदार राजेश पाडवी, शिरिषकुमार नाईक,माजी मंत्री पद्यमाकर वळवी, जि.प.उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत,तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.के.डी.सातपुते आदी उपस्थित होते. ॲड.पाडवी म्हणाले, गेल्या काही वर्षापासून महिला रुग्णालयाचे काम सुरु होते. कोविडच्या...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!