नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांच्या हस्ते जिल्हा परिषद परिसरातील महिला व बालविकास भवनाचे उद्घाटन करण्यात आले.

 जिल्हा  महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषदेचा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ यांची कार्यालये एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देणे सोईचे होण्यासाठी हे भवन कार्यान्वित करण्यात आले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी बापूराव भवाने यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले व भवनाविषयी माहिती दिली.

यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, शिरीषकुमार नाईक, माजी मंत्री पद्माकर वळवी आणि जि.प.चे पदाधिकारी उपस्थित होते.