गरजूं व्यक्तीपर्यंत प्रशासन पोहोचणे गरजेचे-राधाकृष्ण गमे
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचून प्रशासनाने शिधापत्रिकासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजचे आहे आणि महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. नंदुरबार तालुक्यातील फुलसरा गावात महाराजस्व अभियानांतर्गत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध दाखल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, तहसिलदार उल्हास देवरे , सरपंच हिना वळवी, आदी उपस्थित...
Read More
