Author: Ramchandra Bari

जात वैधता पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जात प्रमाणपत्रांची पडताळणी करुन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याची प्रक्रिया 1 ऑगस्ट 2020 पासून पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेली असून अर्जदारांनी ऑनलाईन अर्जामध्ये परिपूर्ण माहिती भरुन अर्जाची प्रिंट काढून विहीत मार्गाने पूर्वीप्रमाणेच सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत समितीस अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. निवडणूक प्रकरणांच्या बाबतीत पूर्वीप्रमाणेच हस्तलिखित अर्ज सादर होण्याची शक्यता असल्याने अशी हस्तलिखित प्रकरणे जातपडताळणी समिती स्विकारणार नाही यांची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य राकेश पाटील यांनी केले...

Read More

जिल्हा प्रशासनातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस मुख्यालयातील ‘गधर्व हॉल’ येथे 16 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि अन्य शासकीय यंत्रणा आपले योगदान देत आहेत. मात्र रक्त संकलन कमी प्रमाणत झाल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. अवघे काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध आहे. महत्वाच्या शस्त्रक्रीयेसाठी रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करणे गरजेचे आहे. राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन प्रशासनाने रक्तदान शिबिर आयेाजित केले आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, विशेषत: युवकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले...

Read More

सीमेवरील सैनिकांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान- डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. अशा सैनिकांच्या सन्मानासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीत प्रत्येकाने उदारतेने योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, सुभेदार मेजर रामदास पाटील आदी उपस्थित होते.                  डॉ.भारुड म्हणाले, सीमेवर जवान देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असल्याने देशातील नागरिकांना सुखाची झोप घेता येते. जवान आणि किसान हे स्वतंत्र भारताचे दोन प्रमुख आधारस्तंभ आहेत. अशा जवानांच्या सन्मानासाठी ध्वजदिन निधी संकलन करण्यात येते. जिल्ह्याने गतवर्षी 101 टक्के उद्दीष्ट गाठले आहे. यावर्षीदेखील जिल्ह्यातील नागरिक या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.                  ध्वजदिन निधीसाठी 1 लाख रुपयांची रक्कम देणाऱ्या तोरणमाळ येथील आश्रमशाळा मुख्याध्यापक प्रदिप पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. त्यांची कृती इतरांनाही प्रेरणा देईल असे डॉ.भारुड म्हणाले. तोरणमाळ आश्रमशाळेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शुद्धीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करावा, त्यास मंजूरी देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.                  अपर जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असल्याचे सांगितले.                  यावेळी शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहीद राजाराम खोत आणि ज्ञानेश्वर पाटील यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.                  गतवर्षी 31 लाख 30 हजार उद्दीष्ट असताना 33 लाख 70 हजार निधी संकलन झाले अशी माहिती यावेळी देण्यात...

Read More

मुदत संपणाऱ्या 87 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाच्या 11 डिसेंबर 2020 रोजीच्या आदेशानुसार माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित एकूण 87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. तहसीलदार मंगळवार 15 डिसेंबर 2020 रोजी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करतील. नमुना अ अ मध्ये नमूद ठिकाणी 23 ते 30 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत ( 25,26 व 27 डिसेंबर 2020 ची सार्वत्रिक सुट्टी वगळून ) नामनिर्देशनपत्रे मागविता व  सादर करता येईल. गुरुवार 31 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्र  छाननी करण्यात येईल. सोमवार 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येईल. सोमवार 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिध्द करण्यात येईल. शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 .30 वाजेपर्यंत मतदान होईल. तर सोमवार 18 जानेवारी 2021  रोजी मतमोजणी होणार असून निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना 21 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. ग्रामपंचायत निवडणूकीकरीता उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र सादर करतांना निवडून आल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या जात पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत विहित नमुन्यातील हमीपत्र व जातपडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती सादर करण्याची मूभा उमेदवारांना दिली आहे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन ) बालाजी क्षीरसागर यांनी कळविले...

Read More

सरपंच पदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम रद्द

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेर समाविष्ट असलेल्या 519 ग्रामपंचायती व अनुसूचित क्षेत्राबाहेरील 76 ग्रामपंचायती अशा एकूण 595 ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच पदाचा 17 डिसेंबर 2020 रोजी बिरसामुडा सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे होणारा आरक्षण सोडत कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.  ग्राम विकास विभागाच्या निर्देशानुसार सरपंच सोडत कार्यक्रम हा राज्य निवडणूक आयोगाच्या माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या घोषीत निवडणूक कार्यक्रमाच्या मतदानानंतर 15 जानेवारी 2021 नंतर राबविण्यात येणार असल्याने 17 डिसेंबर रोजीचा आरक्षण कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.  सुधारीत आरक्षण सोडतीची तारीख लवकर कळविण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन ) बालाजी क्षीरसागर यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!