नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस मुख्यालयातील ‘गधर्व हॉल’ येथे 16 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि अन्य शासकीय यंत्रणा आपले योगदान देत आहेत. मात्र रक्त संकलन कमी प्रमाणत झाल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. अवघे काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध आहे. महत्वाच्या शस्त्रक्रीयेसाठी रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करणे गरजेचे आहे.

राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन प्रशासनाने रक्तदान शिबिर आयेाजित केले आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, विशेषत: युवकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.