विभागीय आयुक्त गमे यांच्या हस्ते चिमलखेडी येथील अंगणवाडी सेविका रेलू वसावे यांचा सत्कार करण्यात आला. माता आणि बालकाच्या पोषणासाठी स्वत: बोट चालवून विविध पाड्यांपर्यंत पोषण आहार पोहचविण्याचे रेलूताईंचे कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी श्री. गमे म्हणाले. दुर्गम भागातील अंगणवाड्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यानंतर विभागीय आयुक्तांनी नियोजन भवन इमारत बांधकामाची पाहणी केली. इमारतीच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त  केले.