Author: Ramchandra Bari

जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज सादर करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत  जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू व  मार्गदर्शकांच्या कार्याचे आणि योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी देण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सन 2018-2019, 2019-2020, व 2020-2021 या वर्षाकरीता जिल्हा क्रीडा पुरस्कार पुरुष व महिला गटातील गुणवंत खेळाडू, दिव्यांग खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी 11 जानेवारी 2021 रोजी सादर करावयाचे आहेत.  पुरस्काराची नियमावली www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन  देण्यात आली आहे.  पुरस्काराकरीता 1 जुलै ते 30 जून या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. या व्यतिरक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगिरी केलेल्या खेळाडूंना  शासनाच्या  नियमानुसार थेट पुरस्कार देण्यात येतो. प्रमाणपत्र , स्मृती चिन्ह व रोख 10 हजार रुपये पुरस्काराचे स्वरुप आहे. विहीत नमुन्यातील अर्ज 18 ते 28 डिसेंबर 2020 या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपलब्ध असतील. विहित नमुन्यात भरलेला अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांची छायांकित कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो, बंद लिफाफ्यात 11 जानेवारी, 2021 पर्यंत  कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले...

Read More

वयोवृद्ध व्यक्तींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत वयोवृद्ध व्यक्तींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सावली, सीएफआर, हेल्पेज इंडिया, फेस्कॉम व एएससीओपी या संस्थेमार्फत आणि  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या समन्वयातून ज्येष्ठत्वाची ओळख, ज्येष्ठ व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या व उपाययोजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या कायद्यांची ओळख, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजनांची ओळख या विषयावर  प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिबिरात 30 व्यक्तिंना प्रशिक्षण देण्यात येणार असून या प्रशिक्षणाचा कालावधी 4 दिवस आहे. प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी 9860964323 या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग व्यक्तिंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, नंदुरबार यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!