जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जनजागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा माहिती कार्यालयातर्फे कोविड-19 या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोककला पथकातर्फे पथनाट्य सादर केले जाणार आहे. शुक्रवार 18 डिसेंबर 2020 पासून या जनजागृती मोहिमेची सुरुवात तळोदा तहसील कार्यालय येथे होणार आहे. त्यासोबत आमलाड, मोड, प्रतापपूर येथे देखील याच दिवशी कार्यक्रम सादर करण्यात येतील. शनिवार 19 डिसेंबर 2020 रोजी नवापूर तालुक्यातील बसस्थानक, विसरवाडी, चिंचपाडा, देवळाफळी, खांडबारा येथे पथनाट्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. या कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी केले...
Read More
