Author: Ramchandra Bari

डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेश शासकीय कोट्यातील रिक्त जागांसाठी विशेष फेरीचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेतल्यानंतर रिक्त असलेल्या जागा विशेष फेरीद्वारे भरण्यात येणार असून प्रथम येणाऱ्यास  प्राधान्य देण्यात येणार आहे. विद्यार्थी  www.maa.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात. सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली, अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. डी.एल.एड. प्रवेशासाठी खुल्या संवर्गातील विद्यार्थी 49.5 टक्के, व इतर संवर्गातील विद्यार्थी 44.5 टक्क्यांसह 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  22 ते 26 डिसेंबर 2020 तारखेपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येतील. पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची पडताळणी करणे व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश पात्र करण्याचा कालावधी 22 ते 27 डिसेंबर पर्यंत राहील. खुल्या संवर्गासाठी प्रवेश अर्ज शुल्क 200 तर इतर संवर्गासाठी 100 रुपये आहे. अर्ज पूर्ण भरुन मान्य केलेले परंतू प्रवेश न घेतलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तसेच अर्ज अपूर्ण किवा दुरुस्ती  असल्यास नव्याने प्रवेश अर्ज भरुन इच्छुक असलेले सर्व उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज ऑनलाईन अप्रुव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेशप्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्यांने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल, लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्‍यापक विद्यालयात चार दिवसाच आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे. प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरीनंतर प्रवेशासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य  डॉ.जे.ओ. भटकर यांनी कळविले...

Read More

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा नंदुरबार जिल्हा दौरा कार्यक्रम

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 23 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9.00 वाजता हॉटेल कृष्णाई, साक्री रोड धुळे येथून नंदुरबारकडे प्रयाण. 10.30 वा. सर्कीट हाऊस नंदुरबार येथे आगमन. 11.00 वा. नंदुरबार शहरातील विविध चौकात शिवसेना नामफलकाचे अनावरण. 11.30 वा. नंदुरबार, नवापूर, शहादा विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 2.00 वा. धडगांव येथे आगमन व भोजन. 2.30 वा. धडगाव शहरातील विविध ठिकाणी शिवसेना नामफलकाचे अनावरण. 3.00 वा. धडगाव तालुका पदाधिकारी मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 6.00 वा. अक्कलकुवा येथे आगमन. 6.30 वा. अक्कलकुवा येथील शैक्षणिक संकुलास भेट. 7.30 वा. मु.कोयली विहिर अक्कलकुवा येथे जिल्हाप्रमुख आमशादादा पाडवी यांच्या कन्येच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थिती. रात्री 8.00 वाजता अक्कलकुवा येथून नंदुरबारकडे प्रयाण. 9.00 वा. सर्कीट हाऊन नंदुरबार येथे आगमन व मुक्काम. गुरुवार 24 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता सर्कीट हाऊस नंदुरबार येथून दोंडाईचा मार्गे धुळ्याकडे...

Read More

महिला लोकशाही दिनाचे आयोजन नाही

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : समस्याग्रस्त व पीडीत महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जाणारा डिसेंबर महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता होणार नाही.  महिला लोकशाही दिनात अर्ज करावयाचा असल्यास अर्जदारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता आपले तक्रार अर्ज अर्ज wcdnandurbar@gmail.com  या ईमेलवर किंवा 9420372067 या व्हॉट्सॲप क्रमांकावर 21 डिसेंबर,2020  रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठवावेत.   सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,रुम नंबर 226, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,टोकरतलाव रोड,नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210047) येथे संपर्क साधावा, असे सदस्य सचिव महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सु.शं.इंगवले यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!