Author: Ramchandra Bari

गृह अलगीकरणाची सुविधा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी 20 फेब्रुवारी 2021 पर्यंत गृह अलगीकरणाची सुविधा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. कोविड बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात यावे. संबधित अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील कोविड रुग्णालयांचा आढावा घेऊन आवश्यक सुविधा असल्याची खात्री करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. गृह अलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झालेल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसात कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर आदेश देण्यात आले आहेत. संपर्कातील सर्व व्यक्तींची नोंद घेण्याचे निर्देश कोविड बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची नोंद घेण्याचे निर्देशही डॉ.भारुड यांनी दिले...

Read More

जागतिक एड्स दिन विविध कार्यक्रमाने साजरा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांचेमार्फत ऑनलाईन पद्धतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. एचआयव्ही जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील युवक युवतींसाठी एचआयव्ही/एड्स कोरोना, सोशल डिस्टसिंग या विषयावर पोस्टर स्पर्धा, कागदापासून किंवा कापडापासून मास्क तयार करणे, जिआयएफ मीमस् र्स्धा व सेल्फी विथ स्लोगन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.  एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती, मातेकडून बालकास एचआयव्ही एड्स  संसर्गापासून प्रतिबंध, स्वताचे एचआयव्ही स्टेटस जाणून घ्या, जागतिक एकता व सामायीक जबाबदारी आदि विषयांवर ऑनलाईन व्हीडीओ तयार करणे व वक्तृत्व स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले. सर्व स्पर्धेतील विजेत्यांना पारीतोषिक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.  विवाहपूर्व...

Read More

शाळा-महाविद्यालयातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करा-जिल्हाधिकारी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महिन्यातील एक दिवस जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयातून वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक माहिती देण्यात यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ‍जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्याकारी अधिकारी रघुनाथ गावडे, कार्यकारी अभियंता योगेश कुलकर्णी, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक के.डी.सातपुते, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी कायद्यासोबत नागरिकांना नियमांचे पालन करण्याची सवय असणेदेखील महत्वाचे आहे. त्यासाठी शिस्तपालन करणारी पिढी घडविण्याची...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!