Author: Ramchandra Bari

नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती, सर्व घटकांना होणे आवश्यक :- मुकाअ श्री रघुनाथ गावडे

नंदुरबार (प्रतिनिधी)- नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील नमुद करण्यात आलेल्या सर्व बाबींची माहिती शिक्षण क्षेत्राशी निगडीत सर्व घटकांना होणे आवश्य्क आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने आयोजीत केलेल्या वेबिनारचा नक्कीच सर्वांना उपयोग होईल, असा विश्वास नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य् कार्यकारी अधिकारी श्री. रघुनाथ गावडे यांनी व्यक्त् केला. नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद, शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यामिक) यांच्या संयुक्त् विद्यमाने आयोजित वेबिनार मालीकेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेने व संचालक, मिपा, औरंगाबाद यांच्या निर्देशानुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यामिक) जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम...

Read More

गृह विलगीकरण बंद करणार-डॉ.भारुड

कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता गृह विलगीकरणाची सुविधा त्वरीत बंद करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील. आरोग्य यंत्रणेने स्वॅब संकलन पथकांची संख्या वाढवावी. कोरोना बाधित आढळलेल्या गावातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावात सर्वेक्षण करावे आणि त्यानुसार फिरत्या पथकाने त्वरीत त्याठिकाणी जाऊन स्वॅब संकलन करावे. सिटी स्कॅन सुविधा असलेल्या रुग्णालयांना निमोनियाच्या रुग्णांची माहिती प्रशानाला देण्याचे निर्देश देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य यंत्रणेकडील नादुरुस्त रुग्णवाहिका दुरुस्त करण्यासाठी माहिती घेऊन प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला टास्क फोर्सचे सदस्य डॉ.राजेश वसावे, डॉ.रोशन भंडारी, डॉ.किरण जगदेव, डॉ.गौरव...

Read More

संसर्ग अधिक असलेल्या भागात सर्वेक्षण वाढवा-डॉ.सुभाष साळुंखे

नंदुरबार – जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात कोरोनाचा वाढलेला संसर्ग लक्षात घेता संसर्ग अधिक असलेल्या भागावर लक्ष केंद्रीत करून या भागातील सर्वेक्षण वाढवावे, अशा सूचना राज्य शासनाचे कोविड टास्क फोर्स सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी  डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते. डॉ.साळुंखे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्याने कोरोना नियंत्रणात चांगली कामगिरी केली. मात्र गेल्या काही दिवसात बाधितांची संख्या वाढत असल्याने विशिष्ठ भागाकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. कोरोना बाधितांची संख्या अधिक असलेल्या गावात संपर्क साखळी शोधणे आणि अधिक जोखिमीच्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यावर भर द्यावा. तापाचे रुग्ण अधिक असणाऱ्या भागातदेखील तपासणी करण्यात यावी. कोरोना नियंत्रणासाठी नवीन पद्धत न अवलंबता आहे त्या पद्धतीत आवश्यक बदल करावे. जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीचा अधिक वापर होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांकडून 48 तासानंतर  माहिती घेण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!