दुर्गम भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देणार-पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी
नंदुरबार -दुर्गम भागातील आदिवासी जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यात येतील आणि त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य शासनातर्फे करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, उपाध्यक्ष राम रघुवंशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, उपसभापती विजय पाडवी, जि.प.सदस्य बाजूबाई वसावे, सरपंच ममताताई पाडवी, वैद्यकीय अधिकारी स्वप्नील मासखेडे आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाडवी म्हणाले, दुर्गम भागासाठी आरोग्य सेवा महत्वाची आहे. आरोग्य सुविधांचा विकास करण्यावर शासनाने भर दिला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे...
Read More
