Author: Ramchandra Bari

विशेष केंद्रीय सहाय्य योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागामार्फत विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत आदिवासी स्वयंसहाय्यता पुरुष व महिला बचत गटास पोल्ट्री- फार्म व्यवसायासाठी तसेच आदिवासी स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना शेळी गटाचा पुरवठा करण्यासाठी ( प्रती युनिट 10 शेळी व 1 बोकड) अर्ज मागविण्यात आले आहेत. स्वयंसहायता बचत गट तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील असावा. गटाची महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान‍ किंवा पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी असावी. परीपूर्ण भरलेले अर्ज हे कार्यालयीन वेळेत 31 जानेवारी 2021 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा जि.नंदुरबार येथे सादर करण्यात यावेत. जास्तीत जास्त गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प...

Read More

सोयाबीनच्या स्वउत्पादित बियाण्याचा शेतकऱ्यांनी वापर करावा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 मध्ये सोयाबीनच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वउत्पादित बियाण्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. सोयाबीन हे स्वपरागसिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्यांच्या उत्पादनातून  होणारे सोयाबीन बियाणे  दोन वर्षापर्यंत वापरता येते. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होवू शकतो. शास्त्रीयदृष्ट्या असे बियाणे पेरणीसाठी वापरता येते. ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्यक्षिके योजनांतर्गत शेतकरी समूह यांचेकडून आलेल्या उत्पन्नातून बियाण्याची चाळणी करून चांगल्या प्रतीच्या बियाण्याची निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्यांची उगवण क्षमता...

Read More

महिला बचत गटांना शेळी गट पुरवठासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र शासनाकडील सन 2014-2015 करिता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत महिला बचत गटांना शेळी गट पुरवठा योजनेचा लाभ देण्यासाठी नोंदणीकृत आदिवासी महिला बचत गटाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  शेळी गट व्यवसायासाठी बचत गटातील सर्व सदस्य अनुसूचित जमातीचे असावे. लाभार्थी गट नोंदणीकृत असावा. अर्जासोबत बचत गट स्थापनेचा ठराव, सदस्याची यादी, गटातील सदस्याचे जातीचे दाखले, रहिवाशी दाखले, फोटो, आधार कार्ड, बचत गटाचे नावे असलेले बँक खाते क्रमांक, सर्व सदस्याचे दारिद्र्य रेषेखालील उत्पन्न दाखला, यापूर्वी इतर योजनेतून लाभ न घेतल्याचा दाखला, ग्रामसभेचा ठराव, वाड्यासाठी जागा उपलब्धेचा दाखला, एका सदस्याचे  नावे सातबारा उतारा असणे आवश्यक राहील. पात्र लाभार्थ्यांनी...

Read More

मृत पक्षी आढळल्यास प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : बर्ड फ्लू रोगाचा प्रादूर्भाव महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आढळून आला असल्याने जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक तसेच नागरिकांनी कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फॉर्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कोंबड्या मृत  झाल्याचे निदर्शनास आल्यास  तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये माहिती द्यावी.             मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा परस्पर विल्हेवाट लावू नये.  प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 च्या कलम 4 (1) अन्वये प्रत्येक पशूपालक अथवा व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, यांनी रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या...

Read More

चोला मंडलम फायनान्स कंपनीला नंदुरबार ग्राहक मंचाचा दणका

नंदुरबार (प्रतिनिधी) – जप्त केलेले वाहन सुस्थितीत परत करावे, अथवा वाहनाची रक्कम 7 लाख रुपये तक्रारदाराला व्याजासह परत करावी, असा निकाल नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चोला मंडलम या फायनान्स कंपनीला दिला आहे.  या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, नंदुरबार येथील नसीर शहा रमजान शहा यांचे एम. एच. 18 डब्ल्यू – 65 67 या क्रमांकाचे सुमारे 14 लाख रुपये किमतीचे वाहन आहे. यावर त्यांनी चोला मंडलम या फायनान्स कंपनीकडून पाच लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. त्यांचा व्यवहार चांगला असल्याने कंपनीने पुन्हा त्यांना तीन लाखाचे कर्ज मंजूर केले. शहा यांनी दोन्ही कर्जाचे हप्ते नियमित भरले आहेत. तथापि या वाहनाचा...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!