नंदुरबार नगरपालिका सभापतींची बिनविरोध निवड
https://youtu.be/4d9RZZkZVcI...
Read MorePosted by Ramchandra Bari | Jan 13, 2021 | निवडणूक, व्हिडीओ |
https://youtu.be/4d9RZZkZVcI...
Read MorePosted by Ramchandra Bari | Jan 13, 2021 | आरोग्य, कोरोना |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे 12410 डोस प्राप्त झाले असून नाशिक येथील आरोग्य विभाग उपसंचालक कार्यालयातील शीतगृहातून विशेष वाहनाने हे डोस जिल्हा परिषद परिसरातील जिल्हा लस भांडार गृह इमारतीत आणण्यात आले. जिल्ह्यात 16 जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास सुरूवात होणार आहे. तोपर्यंत हे लसीचे डोस भांडारातील शीत पेटीत 2 ते 8 अंश तापमानात ठेवण्यात येणार आहेत व या ठिकाणाहून तालुका स्तरावर लसींचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात लस ठेवण्यासाठी 7 शितपेट्या असून आणखी 24 शीतपेट्या लवकरच प्राप्त होणार आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी...
Read MorePosted by Ramchandra Bari | Jan 13, 2021 | व्यापार उद्योग |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र शासनाकडील सन 2017-2018 करिता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी पुरुष व महिला बचत गटांना पोल्ट्री फॉर्म व्यवसायासाठी अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यासाठी नोंदणीकृत प्रमाणपत्र असलेल्या इच्छुक व पात्रताधारक बचत गटाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पोल्ट्री फॉर्म व्यवसायासाठी बचत गटातील सर्व सदस्य अनुसूचित जमातीचे असावे, बचत गट नोंदणीकृत असावा. अर्जासोबत बचत गट स्थापनेचा ठराव, सदस्याची यादी, गटातील सदस्याचे जातीचे दाखले, रहिवाशी दाखले, फोटो, आधार कार्ड, सर्व सदस्याचे दारिद्रय रेषेखालील उत्पन्न दाखला (2 लाखाच्या आतील ) जमीनीचा सातबारा उतारा, बचत गटाच्या बॅंक पासबुकाची झेरॉक्स प्रत, बँकेचे 6 महिन्याचे स्टेटमेंट, बचत गटास जमीन 5 वर्षेसाठी वापरण्यास देत असल्याबाबत जमीन मालक व बचत गटातील सदस्य यांचे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर हमीपत्र, तसेच यापूर्वी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याचे ग्रामपंचायतीचा दाखला किंवा स्वयंघोषणापत्र, पोल्ट्री फॉर्म भाड्याने देणार नाही किंवा विकणार नसल्याचे हमीपत्र, देखभाल दुरुस्तीबाबत हमीपत्र सादर करावे. गटातील किमान एका लाभार्थ्यांकडे स्वत:च्या नावे किमान अर्धा एकर जमीन, बारमाही पाणी, वीज आणि चार चाकी मोठे वाहन जाईल असा रस्ता इत्यादी सुविधा असणे आवश्यक राहील. पात्र लाभार्थ्यांनी 15 जानेवारी पर्यंत (कार्यालयीन वेळ 10 ते 6 वाजेपर्यंत ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नवापूर रोड नंदुरबार येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, वसुमना पंत यांनी केले...
Read MorePosted by Ramchandra Bari | Jan 13, 2021 | निवडणूक |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून निवडणूक क्षेत्रातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी यादिवशी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक होणाऱ्या ग्रामपंचायतीपैकी नागरी क्षेत्रालगतच्या (विशेषत: नगरपालिका क्षेत्रालगतच्या) मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये राहणारे बहुतांश मतदार हे कामधंद्याकरीता नागरी क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमाच्या आस्थापना, दुकाने, औद्योगिक आस्थापना (एमआयडीसी) इत्यादी ठिकाणी ये-जा करीत असतात. अशा मतदारांना मतदानाच्या दिनांकास मतदान करता यावे यासाठी तसेच निवडणूक मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक क्षेत्रातील सर्व आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्य गृहे, व्यापार,औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना या मधील कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी किंवा विशेष सवलत दिली आहे. शहरी भागात किंवा निवडणुका नसलेल्या ग्रामीण भागातील दुकाने, कंपन्या, आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नाही. सर्व आस्थापना मालकांनी या आदेशाचे पालन करावे असे सरकारी कामगार अधिकारी धुळे यांनी कळविले...
Read MorePosted by Ramchandra Bari | Jan 13, 2021 | आरोग्य, कोरोना, समाजकारण |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत पिरॅमल स्वास्थतर्फे जिल्ह्यातील आरोग्य आणि महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यासाठी 30 हजार एन-95 मास्क भेट देण्यात आले. पिरॅमल स्वास्थ्यच्या संवाद अधिकारी रंजना पांडे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडे प्रातिनिधीक स्वरुपात मास्क सूपुर्द केले. यावेळी पिरॅमल स्वास्थ्यचे जिल्हा परिवर्तन अधिकारी निलचंद्र शेंडे उपस्थित होते. पिरॅमलतर्फे हे मास्क तालुकास्तरावर वितरीत करण्यात येणार आहे आणि कोविड मार्गदर्शक सूचना व पोषण आहारविषयक माहितीदेखील यावेळी देण्यात येणार...
Read More