नंदुरबार कोविड केअर सेंटर त्वरीत सुरू करा- डॉ.राजेंद्र भारुड
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार येथील कोविड केअर सेंटर त्वरीत सुरू करावे आणि लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना त्या ठिकाणी स्थलांतरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. कोविड-19 बाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पंडा, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावात एकही कोरोना बाधित आढळल्यास संपर्कातील सर्व व्यक्तींची स्वॅब चाचणी करावी. चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्यापैकी कोणीही घराबाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तहसीलदार आणि...
Read More
