जिल्ह्यात उत्तम शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न- ॲड.के.सी.पाडवी
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी उत्तम शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, तीन एकलव्य निवासी शाळांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील राणीपूर येथे आश्रमशाळा इमारतीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उभारण्यात येत आहे. वर्ग खोल्यांची दुरुस्ती आणि नव्या वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. येत्या काळात प्रत्येक शासकीय शाळेला स्वत:ची इमारत असावी असे प्रयत्न करण्यात...
Read More
