Author: Ramchandra Bari

राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम

राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदान आणि मतदार जागृतीत सहभागी व्हा-डॉ.राजेंद्र भारुड नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान करणे आवश्यक असून  युवक आणि नागरिकांनी राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदान करावे आणि मतदार जागृतीच्या कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.             तहसिल कार्यालय नंदुरबार येथे आयोजित 11 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उप जिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार राहुल वाघ आदी उपस्थित होते.             डॉ.भारुड म्हणाले, जिल्ह्यात दुर्गम भागात मतदान केंद्र असूनही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करीत मतदानाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला...

Read More

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सामूहिक शपथ

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृती सामूहिक शपथ घेण्यात आली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, नायब तहसिलदार राहुल वाघ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित...

Read More

जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना क्रीडा पुरस्कार जाहीर

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबारद्वारा  सन 2018, 2019 व 2020 या तीन वर्षांसाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार  जाहीर करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या हस्ते  व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व  दहा हजार रुपये रोख स्वरुपात प्रदान करुन  खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे. 2018 वर्षांसाठी जिल्हा गुणवंत संघटक म्हणून पुष्पेंद्र रघुवंशी तर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून शांताराम दिपा मंडाले, 2019 वर्षांसाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक शेख वसीम शेख सुव्हान, गुणवंत पुरूष खेळाडू हेमचंद्र मराठे, गुणवंत महिला खेळाडू  चिन्मयी  चव्हाण, गुणवंत दिव्यांग खेळाडू विकास बेलदार, 2020 वर्षांसाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक मिनल कुमार वळवी, गुणवंत पुरुष खेळाडू गोपाल चव्हाण, तर गुणवंत महिला खेळाडू म्हणून निहती गुमाणे यांना गौरविण्यात येणार आहे, असे  जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले...

Read More

48 वर्षात महाराष्ट्राच्या चित्ररथाला 12 पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच आकर्षक ठरला आहे. सन 1971 ते 2019 या 48 वर्षाच्या काळात महाराष्ट्राने 36 वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय परंपरेचे दर्शन घडविले आहे. आणि 12 वेळा ऊत्कृष्ट चित्ररथासाठीचा पुरस्कारही पटकाविला आहे. यंदा ‘ वारकरी संत परंपरेवर ’ आधारित चित्ररथ सादर होत आहे. महाराष्ट्राने सन 1971 मध्ये ‘वारली दिंडी’ या विषयावर चित्ररथ सादर केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी 1973 साली ‘ भारत छोडो आंदोलन ’ ही संकल्पना घेऊन या आंदोलनातील महत्वाच्या प्रसंगांचे चित्ररूप राजपथावर सादर केले होते. राज्य निर्मितीपासून अवघ्या 14 वर्षात राज्यांमध्ये विविध मोठे उद्योगधंदे स्थापीत झाले 1974 च्या चित्ररथामध्ये याच उदयोगधंदयाचे प्रतिबिंब राजपथावर...

Read More

पालकमंत्र्याच्या हस्ते धडगाव परीसरातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी .पाडवी याच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत धडगाव परिसरातील विविध रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जि. प.चे समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, जि.प.सदस्य जान्या पाडवी, उपअभियंता एम.एस.नाईक, जिल्हा परिषदेचे  समाज कल्याण अधिकारी देवीदास नांदगावकर आदी उपस्थित होते.             पालकमंत्री यांच्या हस्ते खांडबारा ते हालीगव्हाणपाडा या 3 कोटी 14 लाख खर्चाच्या, शिरसाणी ते बुचक्यापाडा 3.5 किलोमीटर कामासाठी 3 कोटी 79 लाख, खरवड ते सरपंचपाडा 870 मीटर रस्त्यासाठी 1 कोटी तर काकरपाटी ते पाटीलपाडा या 1.92 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 79 लाख रुपये खर्च असलेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!