Author: Ramchandra Bari

आश्रमशाळेतून कौशल्य विकास आणि उद्योजकतेचे शिक्षण देणार – के.सी.पाडवी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आश्रमशाळेच्या माध्यमातून सक्षम आणि स्वयंपूर्ण विद्यार्थी घडावा यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकावर आधारीत शिक्षणही विद्यार्थ्यांना मिळावे असा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले. आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत तळोदा तालुक्यातील राणीपूर येथील माध्यमिक आश्रमशाळा  नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, माजी मंत्री पद्माकर वळवी, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी,  सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा, तहसिलदार गिरीष वखारे आदी उपस्थित होते. ॲड.पाडवी म्हणाले, शैक्षणिक विकासाबरोबर समाजाचा विकासही महत्वाचा आहे आणि त्यासाठी...

Read More

प्रजासत्ताक दिन साजरा करण्याबाबत आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन  दिन समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम 26 जानेवारी 2021 रोजी राज्यभर एकाचवेळी  सकाळी 9-15 वाजता करण्यात येणार असल्याने या दिवशी सकाळी 8.30 ते 10.00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये.  एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 च्या पुर्वी किंवा 10 वाजेनंतर करावा. ध्वजारोहण कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका (सरनामा) चे सामुहिक वाचन करण्यात यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सूचनांचे अनुपालन करण्यात यावे. प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा,  असे उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!