Author: Ramchandra Bari

सरपंच पदाची आरक्षण सोडत 29 जानेवारी रोजी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेर येणाऱ्या शहादा तालुक्यातील 35 व नंदुरबार तालुक्यातील 41 अशा एकुण 76 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तालुकास्तरावर 29 जानेवारी 2021 रोजी शहादा व नंदुरबार तहसिल कार्यालयात काढण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असलेल्या एकुण 519  ग्रामपंचायती व अनुसूचित क्षेत्राबाहेरील 76 ग्रामपंचायती अशा एकूण 595 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाची आरक्षण सोडत 4 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथील बिरसामुंडा सभागृहात काढण्यात येणार आहे.सदर आरक्षण हे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 या पाच वर्षाच्या कालावधीत सार्वत्रिक निवडणूका होऊन गठित होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी लागू असणार आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सदर आरक्षण काढतांना घेण्यात येणाऱ्या सभेत सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत व पुर्नवसन विभाग तसेच जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्यविषयक सुचना व आदर्श कार्यप्रणाली संहिता या बाबींचे पालन होण्याबाबत कटाक्षाने काळजी घेण्यात यावी, असे उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांनी कळविले...

Read More

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडानिमित्त व्याख्यानमाला

नंदुरबार (प्रतिनिधी):- मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त नंदुरबार डाएट व जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे तज्ञ वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या व्याख्यानमालेचे सर्व मराठी प्रेमी नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डाएट व शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.मराठी भाषेच्या वापरासंदर्भात शासकीय कार्यालयाबरोबर शैक्षणिक संस्थाचा सहभाग वाढावा म्हणुन दरवर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’ दिनांक 14 जानेवारी 28 जानेवारी या कालावधीत साजरा करणेबाबत निर्देशित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार, जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/ माध्यमिक) च्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मराठी भाषाप्रेमी नागरिकांसाठी दिनांक 27 व 28 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता व्याख्यानमालेचे आयोजन...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!