Author: Ramchandra Bari

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार -2020

            मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत दि.31 जानेवारी 2021 होती. तथापि या प्रवेशिका सादर करण्याकरिता दि.15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.             राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध...

Read More

संचारबंदी कालावधीत 28 फेब्रुवारी पर्यंत वाढ

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग तसेच अनलॉक फेजमध्ये सुधारीत सूचना व पुन्हा प्रारंभ मोहिमेंतर्गत शासनाकडील वेळोवेळी शिथिल निर्बंध व सुट मुभा देण्यात आलेल्या बाबीं संदर्भातील आदेश कायम ठेवून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यात सोमवार 1 फेब्रुवारी 2021 मध्यरात्रीपासून 28 फेब्रुवारी 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदीस मुदतवाढ दिली आहे. कोणत्याही व्यक्ती, समुह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत  महिलासंबंधी उल्लेखनीय कामकाज केलेल्या व्यक्तींना तसेच संस्थांना नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार हा वैयक्तीक व संस्थेसाठी आहे.  पुरस्कारासाठी लाभार्थ्यांचे वय 1 जुलै 2020 रोजी 25 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे. संस्थात्मक पुरस्कारासाठी संस्थेस महिलासंबंधी कामकाजाचा किमान 5 वर्ष अनुभव असावा. जिल्ह्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींनी तसेच संस्थांनी आपले अर्ज www.narishaktipuraskar.wcd.gov.in  किंवा www.wcd.nic.in या वेबसाईटवर 30 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावे असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!