Author: Ramchandra Bari

अधिछात्रवृत्ती योजनेची निवड प्रक्रिया फेब्रुवारीत होणार

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सारथीच्या लक्षित गटातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती आणि गुणवत्ताधारक एम.फिल व पी.एच.डी करणाऱ्या उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य देण्याकरिता सारथी मार्फत ‘छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती 2020’ करिता उमेदवारांची निवड प्रक्रिया फेब्रुवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पार पाडण्यात येणार आहे. सदर अधिछात्रवृत्तीकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी 342 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जाची छाननी केली असता अनेक उमेदवारांनी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे जोडली नसल्याने तसेच कागदपत्रात त्रृटी असल्याने अशा अर्जाची त्रृटीची पूर्तता करण्यासाठी त्रृटीपूर्तता यादी 23 डिसेंबर 2020 रोजी सारथीच्या www.maharashtra.gov.in-noticeboard वर प्रसिध्द करण्यात आली असून आक्षेप मागविण्यात आले होते. आक्षेपाची त्रृटीची पूर्ततेनंतर 241 पात्र उमेदवारांना मुलाखतीस सारथी, पुणे येथे बोलवले जाणार असल्याचे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी कळविले...

Read More

ई-एपीक (इलेक्ट्रानिक ओळखपत्र) सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील नव्याने नाव नोंदणी केलेल्या मतदारांनी ई-एपीक अर्थात इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र या सुविधेचा  लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी 2021 पासून ई-एपीक (इलेक्ट्रानिक ओळखपत्र )  सुविधेचा शुभारंभ  करण्यात आला आहे. 1 जानेवारी 2021 या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष मोहिमेत नाव नोंदविलेल्या मतदारांना 25 जानेवारी ते 31 जानेवारी 2021 पर्यंत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. आता ही सुविधा 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2021 या पुनरिक्षण कार्यक्रमापुर्वीच्या सर्व मतदारांसाठी केवासीची सुविधा आयोगामार्फत तारीख जाहीर केल्यानंतर उपलब्ध करुन देण्यात...

Read More

‘सफाईगार’ पदासाठी अर्ज सादर करणेबाबत

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील सफाईगाराची 3 पदे कंत्राटी पद्धतीने 8 महिन्याकरिता भरावयाची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड, तळ मजला रुम नं.27, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210026) येथे संपर्क साधावा, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी कळविले...

Read More

आधार व मोबाईल क्रमांक जोडणीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे  आधार व मोबाईल सीडिंग करण्यासाठी 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.             सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी केंद्र सरकारच्या सुचनेनुसार 31 जानेवारीपर्यंत शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे  आधार व मोबाईल क्रमांक जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. अद्यापही सीडिंग न झालेल्या लाभार्थ्यांची रास्तभाव दुकाननिहाय यादी करून 10 फेब्रुवारी पूर्वी या  लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक जोडण्याचे नियोजन तहसील कार्यालय स्तरावर करण्यात येणार आहे.             आधार सीडिंग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य पुढील महिन्यापासून आधार सीडिंग होईपर्यंत निलंबित करण्यात येईल. लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानदार किंवा तहसील कार्यालयामार्फत आधार  व मोबाईल क्रमांक जोडणी करून घ्यावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी कळविले...

Read More

जिल्हा सूचना विज्ञान केंद्रास सीएसआयचा पुरस्कार

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया संस्थेतर्फे स्थानिक प्रशासनात संगणकीय प्रणालीच्या नाविन्यपूर्ण वापरासाठी देण्यात येणारा पुरस्कार जिल्हा सूचना विज्ञान केंद्रास जाहीर झाला आहे. कोरोनाकाळात संगणकीय प्रणालीचा उपयोग करीत आरोग्यदर्शक मॅप आणि प्रतिबंधीत क्षेत्र व रुग्णालयांचे जीआयएस मॅपिंग करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी  धमेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सूचना विज्ञान केंद्राने जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रतिबंधीत क्षेत्राची माहिती मॅपिंगद्वारे उपलब्ध करून दिली होती. त्यासोबतच प्रत्येक रुग्णालयातील  खाटांची क्षमता, वापर, कोरोना बाधितांची माहितीदेखील आलेखाच्या रुपात उपलब्ध करून देण्यात आल्याने या माहितीचा प्रशासन आणि नागरिकांना चांगला उपयोग झाला. या कामगिरीची दखल घेऊन सीएसआयने जिल्हा सूचना विज्ञान केंद्राची पुरस्कारासाठी निवड केली आहे. या संस्थेतर्फे देशभरात संगणकाच्या सहाय्याने उत्तम सुविधा निर्माण करणाऱ्यांना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 12 फेब्रुवारी 2021 रोजी  लखनौ येथे या पुरस्कारांचे वितरण होणार...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!