नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सारथीच्या लक्षित गटातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती आणि गुणवत्ताधारक एम.फिल व पी.एच.डी करणाऱ्या उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य देण्याकरिता सारथी मार्फत ‘छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती 2020’ करिता उमेदवारांची निवड प्रक्रिया फेब्रुवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पार पाडण्यात येणार आहे.

सदर अधिछात्रवृत्तीकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी 342 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जाची छाननी केली असता अनेक उमेदवारांनी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे जोडली नसल्याने तसेच कागदपत्रात त्रृटी असल्याने अशा अर्जाची त्रृटीची पूर्तता करण्यासाठी त्रृटीपूर्तता यादी 23 डिसेंबर 2020 रोजी सारथीच्या www.maharashtra.gov.in-noticeboard वर प्रसिध्द करण्यात आली असून आक्षेप मागविण्यात आले होते.

आक्षेपाची त्रृटीची पूर्ततेनंतर 241 पात्र उमेदवारांना मुलाखतीस सारथी, पुणे येथे बोलवले जाणार असल्याचे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी कळविले आहे.