नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत  महिलासंबंधी उल्लेखनीय कामकाज केलेल्या व्यक्तींना तसेच संस्थांना नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार हा वैयक्तीक व संस्थेसाठी आहे.

 पुरस्कारासाठी लाभार्थ्यांचे वय 1 जुलै 2020 रोजी 25 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे. संस्थात्मक पुरस्कारासाठी संस्थेस महिलासंबंधी कामकाजाचा किमान 5 वर्ष अनुभव असावा. जिल्ह्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींनी तसेच संस्थांनी आपले अर्ज www.narishaktipuraskar.wcd.gov.in  किंवा www.wcd.nic.in या वेबसाईटवर 30 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावे असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे.