नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, नंदुरबार कार्यालयामार्फत विविध योजनेतंर्गत व्यवसायाकरीता कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांस व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्यासाठी एकररक्कमी परतावा (ओटीएस) योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेतंर्गत थकीत कर्जदारांना 31 मार्च 2024 पर्यंत थकीत कर्ज भरुन योजनेचा लाभ घेता येईल. तरी जिल्ह्यातील थकीत लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतरमागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,नंदुरबार जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार ( दूरध्वनी क्रमांक 02564-210062 येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.