नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या नंदुरबार, नवापूर व शहादा या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2023-2024 या शैक्षणिक वर्षांत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, ठाणेपाडा जि.नंदुरबार या निवासी शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वितरित करण्यात येत आहे.

प्रवेश अर्ज 29 एप्रिल, 2023 ते 5 मे, 2023 या कालावधीत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, ठाणेपाडा ता.जि.नंदुरबार ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत मिळतील. परीपुर्ण  भरलेले प्रवेश अर्ज 5 मे 2023 पर्यंत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, ठाणेपाडा जि.नंदुरबार येथे स्विकारण्यात येतील त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले  जाणार नाहीत.

प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पालक किंवा विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत, दारिद्र्यरेषेच्या दाखल्याची सत्यप्रत, दिव्यांग असल्यास सक्षम दाखला जोडावा. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्य प्रमाणपत्राची प्रत जोडावी.

 विद्यार्थ्याचे पालक शासकीय,निमशासकीय सेवेत नसल्याबाबत  हमीपत्र जोडावे. महिला पालक विधवा,घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्यू प्रमाणपत्र, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म 1 जुलै,2016 ते 31 डिसेंबर,2017 या दरम्यान झालेला असावा. 

अर्जासोबत 2 पासपोर्ट फोटो आणि जन्म तारखेचा पुरावा म्हणुन ग्रामसेवक, नगरपालिका यांचा  दाखला जोडावा. अर्जासोबत विद्यार्थ्याचे, वडीलांचे व आईचे आधार कार्डची साक्षांकित प्रत जोडावी. विद्यार्थी व पालक यांच्यावर या अटी शर्ती व नियम बंधनकारक राहतील. कागदपत्राची अपुर्णता असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा,ठाणेपाडा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.