नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): समाज कल्याण, नंदुरबार अधिनस्त  असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली ता.जि.नंदुरबार येथे सन 2023-2024 शैक्षणिक वर्षांसाठी  इयत्ता सहावीच्या वर्गात 40 आरक्षित जागेसाठी तसेच सातवी ते दहावीच्या रिक्त जागांसाठी प्रवेश अर्ज वाटप सुरु असल्याची माहिती  अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बोरसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या निवासी शाळेत निशुल्क शिक्षण व निवासाची सुविधा उपलब्ध आहे. वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थींनी प्रवेश अर्जासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली ता. जि.नंदुरबार येथे  संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती.बोरसे यांनी केले आहे.