नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): नेहरु युवा केंद्रामार्फत स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना, मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृध्दींगत करणे आणि तरुण युवा कलावतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे शुक्रवार 7 जुलै 2023 रोजी नंदुरबार नगरपालिकेतील अटल बिहारी वाजपेयी सभागृहात करण्यात आल्याची माहिती नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी  अशोक मेघवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

युवा महोत्सवांत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी 5 जुलै,2023 दुपारी 12 वाजेपर्यंत https://forms.gle/heUmeVkbsfra7ADTA या लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. युवा महोत्सवात चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धा, कविता लेखन,जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मोबाईल फोटोग्राफी अशा कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी हा नंदुरबा जिल्ह्यातील रहीवाशी असावा. वय 15 ते 29 वर्षांपर्यंत असावे, एका व्यक्तिंला एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल. तसेच विजेत्यांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या जिल्हास्तरीय युवा उत्सवात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक नेहरु युवा केंद्र, नंदुरबार च्या फेसबुक पेज, ट्टिवर पेजवर उपलब्ध आहे.अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्र,नंदुरबार कार्यालयांशी संपर्क साधवा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अशोक मेघवाल यांनी केले आहे.