Author: Ramchandra Bari

शाळाबाह्य बालके शोध मोहिमेसाठी व्यापक जनप्रबोधन व्हावे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून आवाहन

नंदुरबार (प्रतिनिधी):- शाळाबाह्य बालके शोध मोहिमेंतर्गत जिल्ह्यात व्यापक प्रमाणावर सर्वेक्षण सुरू असून, या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सहभागी होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रात जनप्रबोधन करण्याची विनंती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या समता विभागाकडून करण्यात आली आहे.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या समता विभागाकडून याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 23 फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांची शोध मोहीम दिनांक 1 ते 10 मार्च 2021 या दरम्यान सुरू आहे. सदर शोध मोहीम ही जिल्ह्यातील 3 ते 18 वयोगटातील मुलांसाठी असून, यामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणेचा सहभाग आहे. याबाबत व्यापक जनप्रबोधन होण्याच्या दृष्टीने...

Read More

ग्रामीण भागातील 1 ते 4 थींचे वर्ग सुरु करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :   दुर्गम आणि ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा संगळीकडे उपलब्ध नसल्याने ऑनलाईन पध्दतीने शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता अक्राणी व अक्कलकुवा सारख्या दुर्गम भागातील 1 ते 4 थीचे वर्ग सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.             शाळा सुरु करतांना  कोविड 19 बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा या तालुका मुख्यालयाच्या गावात कोविड-19 चे रुग्ण असल्याने या ठिकाणी इयत्ता 1 ते 4 थीच्या शाळा बंद राहतील. तसेच या मुख्यालयाच्या ठिकाणाहून विद्यार्थी आजूबाजूच्या ग्रामीण भागातील शाळेत जात असतील तर ग्रामीण भागातील अशा शाळादेखील बंद राहतील.             इयत्ता 1 ली ते 4 थीचे वर्ग सुरु करतांना आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनाचे मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्यात यावेत. ग्रामीण भागातील शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांच्या पालकासमवेत बैठक आयोजित करुन विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना कोविड 19 संदर्भातील आव्हाने व भूमिका बाबात माहिती द्यावी. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना हँड सॅनिटायझर, साबण, मास्क उपलब्ध करुन देण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायतीचे सहाय्य घेण्यात यावे. यासाठी वेळोवेळी विद्यार्थी व पालक यांचे प्रबोधन करावे, आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी.             आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा तसेच समाज कल्याण विभागाच्या आश्रमशाळा सुरु करण्यासंदर्भात संबंधित विभागांनी पालकांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घ्यावा. सद्यस्थितीत या शाळांतील विद्यार्थी...

Read More

रोपवाटीका योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  कृषि विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना सन 2020-2021 योजना राबविण्यात येत असून यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांकडून 9 मार्च 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. शेटनेटगृह 1000 वर्ग मिटर 3.25 उंचीचे फ्लॅट टाईपच्या आणि 3 लाख 80 हजाराच्या प्रकल्पासाठी अधिकाधिक 1 लाख 90 हजार अनुदान मिळेल. पॉलीटनेल 1000 वर्ग मिटरच्या 60 हजारच्या प्रकल्पासाठी  अधिकाधिक 30 हजार, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर क्षमता 19-16 लिटर 0.69 ते 1.0 एच.पी तसेच बीआयएस प्रमाणकानुसार असलेल्या 7 हजार 600 च्या प्रकल्पासाठी अधिकाधिक 3 हजार 800 रुपये आणि  क्रेटस 62 च्या 12 हजार 400च्या ग्राह्य प्रकल्पासाठी  अधिकाधिक 6 हजार 200 दोनशे अनुदान असेल. या योजनेसाठी अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटीकासाठी पाण्याची सोय असावी. यापुर्वी शासनाच्या शेडनेटसाठी अनुदान घेतलेले शेतकरी पात्र असणार नाही. या योजनेंतर्गत लाभार्थी निवडतांना तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास महिला कृषि पदवीधर, महिला गट, महिला शेतकरी गटांना प्राधान्य देण्यात येईल. अक्कलकुवा तालुक्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक व अनुसूचित जमातीसाठी एक असे एकूण दोन लक्षांक देण्यात आले आहेत. योजनेसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दोन टप्प्यात अनुदान देण्यात येईल. यात प्रकल्प उभारणी नंतर प्रथम 60 टक्के  म्हणजे 1 लाख 38 हजार रुपये अनुदान आणि उर्वरीत द्वितीय 40 टक्के म्हणजेच महत्तम 92 हजार रुपये अनुदान रोपवाटिकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री, उचल झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करण्यात येईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, अक्कलकुवा जि.नंदुरबार कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी अक्कलकुवा यांनी केले...

Read More

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात कंत्राटी पद्धतीने माजी सैनिकाची भरती

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये उप निरीक्षक, प्रधान आरक्षक, जीडी पदाकरीता कत्राटी पद्धतीने 50 वर्षाखालील माजी सैनिकांची भरतीसाठी 15 मार्च 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.          धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भरतीसाठी इच्छुक माजी सैनिकांनी त्यांचे अर्ज सी.आय.एस.एफ च्या ईमेलवर पाठविण्यात यावेत. अर्जाचा नमुना व ईमेल पत्ता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आला असून माजी सैनिकांनी या भरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  संजय गायकवाड यांनी केले...

Read More

यंत्रमाग घटकांना वीजदर सवलतीसाठी मुदतवाढ

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018-2023 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना  लागू करण्यात आलेल्या वीजदर सवलतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची मुदत  31 मे 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.  वीजदर सवलतीचा अर्ज आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असून 27 अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांनी नोंदणी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकारे करु शकतात. ऑफलाईनद्वारे सादर करावयाचा अर्ज भरुन आयुक्त वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे सादर करावा.  यंत्रमाग धारकांनी नोंदणी अर्ज केल्याशिवाय त्यांना वीजदर सवलतीचा लाभ देता येणार नाही असे वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!