Author: Ramchandra Bari

दुर्गम भागातील महिलांमधील रक्तक्षय समस्या कमी करण्याचा संगीता शिंदे यांचा निश्चय

नंदुरबार – पतीचे पाच वर्षापूर्वी निधन झाले….आई-वडीलांचे मायेचे छत्रही  नाही…मोठ्या भावाचा मिळालेला आधार तिला लाखमोलाचा….आपल्या दोन मुलींकडे पाहून तीने स्वत:ला सावरले…दुर्गम भागातील रक्तक्षयाची समस्या दूर करण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ती प्रत्येक डोंगराळ भागातील पाड्यांवर जाते…..धडगाव तालुक्यातील निगदी उपकेंद्रातील आरोग्य सेविका संगीता शिंदे यांनी गेली आठ वर्षे आरोग्यसेवेचा हा प्रवास सुरू ठेवला आहे. संगीता यांचे पती गिरीष हुरेज यांचे आजारामुळे दुर्दैवी निधन झाल्यावर त्यांच्यासमोर भविष्याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे होते. मात्र मुलींसाठी आणि आपल्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी जबाबदारीपासून दूर होणे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी तशाही परिस्थितीत  आपले काम पुढे नेले. रुग्णांच्या वेदना कमी केल्यावर मिळणाऱ्या समाधानात आपले दु:ख विसरण्याचा...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!