Author: Ramchandra Bari

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी करावी – विजय रिसे

नंदुरबार (जिमाका वृत्त) – फ्रांन्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी नोंदणी करावी असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. वर्ष 2024 मध्ये आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा ही जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन होणार असून या स्पर्धेत प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्यासाठी सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालये, कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था आदि संस्थेतील उमेदवारांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.   यासाठी इच्छूक पात्र उमेदवारांनी https://Kaushalya.mahaswayam.gov.in अथवा https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर 7 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी.  स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2002 व त्यानंतरचा असून आवश्यक असून याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार येथे प्रत्यक्ष अथवा  02564-295801 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क...

Read More

दिव्यांगांना मोफत मिळणार पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान – शोभा कराड

नंदुरबार (जिमाका वृत्त) – दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत दिव्यांग व्यक्तिंसाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती शोभा कराड यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालणा देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, तसेच सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे त्यांना कुटूंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा योजनेचा उद्देश असून या योजनेचा लाभ मिळण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in  ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.   या लिंकवर दिव्यांग व्यक्तींनी 4 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, असेही श्रीमती कराड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले...

Read More

27 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक

नंदुरबार (जिमाका वृत्त) – जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक बैठक बुधवार 27 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4.00 वाजता जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. जिल्हा व तहसिलस्तरावर भ्रष्टाचार निर्मुलन समित्या व दक्षता पथके स्थापन करण्यात आले असून शासकीय कर्मचाऱ्यांविरुध्द प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक आयोजित केली जात असल्याचेही श्री. खांदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले...

Read More

28 डिसेंबर ला होणार रोजगार मेळावा – विजय रिसे

नंदुरबार (जिमाका वृत्त) – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिजामाता शिक्षण संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 28 डिसेंबर, 2023 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कुल जिजामाता महाविद्यालय शेजारी, नंदुरबार येथे सकाळी 10 वाजता होणाऱ्या या मेळाव्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.  नोंदणी न केलेल्यांनी शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल.  तो वापरुन पोर्टलवर लॉगिन करावे, त्यानंतर आपल्या नोंदणीच्या माहितीतील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर मधील दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील नंदुरबार जिल्हा निवडून त्यातील रोजगाराची माहिती पहावी व रिक्तपदांची माहिती पाहून नोंदणी करावी.  त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होईल. याबाबत काही मदत आणि माहितीसाठी कार्यालयाच्या 02564-295805 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.  या मेळाव्याचा इच्छुक उद्योजक आणि बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!