नंदुरबार (जिमाका वृत्त) – दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत दिव्यांग व्यक्तिंसाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती शोभा कराड यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालणा देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, तसेच सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे त्यांना कुटूंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा योजनेचा उद्देश असून या योजनेचा लाभ मिळण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in  ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.   या लिंकवर दिव्यांग व्यक्तींनी 4 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, असेही श्रीमती कराड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.