Author: Ramchandra Bari
рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдпреБрд╡рд╛ рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░ 2022 рдЬрд╛рд╣реАрд░- 1 рдореЗ, рдорд╣рд╛рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░ рджрд┐рди рд░реЛрдЬреА рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рд╡рд┐рддрд░рдг
Posted by Ramchandra Bari | Apr 28, 2023 | рдЗрддрд░, рд╢рд╛рд╕рдХреАрдп |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबारद्वारा सन 2022 या वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून 1 मे,महाराष्ट्र दिन रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी मनीषा खत्री व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधिताना प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हा युवा पुरस्काराचे स्वरुप युवक व युवती यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र व दहा हजार रुपये रोख स्वरुपात तसेच युवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेस सन्मानचिन्ह, गौरवपत्र व 50 हजार या प्रमाणे देण्यात येणार आहे. सन 2022 वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार (युवक ) श्री.मुकेश नागराज पाटील यांना राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, शिक्षण क्षेत्रात कार्य, युवकांचा सर्वागींण विकासासाठी कार्य,नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील कार्य,इत्यादी कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर जिल्हा युवा पुरस्कार (युवती) साठी कु.तेजस्विनी मोहन चौधरी यांना महिला सक्षमीकरण क्षेत्रात कार्य, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय केलेले कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच 2022 साठी जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) युवकमित्र परिवार,कोठली ता.शहादा जि.नंदुरबार यांना राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटकासाठी केलेले कार्य, अनुसूचित जमातीसाठी कार्य, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, युवकांचा सर्वागींण विकास व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील कार्यासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले...
Read MoreрдореБрд▓реАрдВрдЪреНрдпрд╛ рдирд┐рд╡рд╛рд╕реА рд╢рд╛рд│реЗрдд рдкреНрд░рд╡реЗрд╢рд╛рд╕рд╛рдареА рдЕрд░реНрдЬ рд╡рд╛рдЯрдк рд╕реБрд░реБ
Posted by Ramchandra Bari | Apr 27, 2023 | рд╢рд╛рд╕рдХреАрдп, рд╢реИрдХреНрд╖рдгрд┐рдХ |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): समाज कल्याण, नंदुरबार अधिनस्त असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली ता.जि.नंदुरबार येथे सन 2023-2024 शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता सहावीच्या वर्गात 40 आरक्षित जागेसाठी तसेच सातवी ते दहावीच्या रिक्त जागांसाठी प्रवेश अर्ज वाटप सुरु असल्याची माहिती अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बोरसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. या निवासी शाळेत निशुल्क शिक्षण व निवासाची सुविधा उपलब्ध आहे. वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थींनी प्रवेश अर्जासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली ता. जि.नंदुरबार येथे संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती.बोरसे यांनी केले...
Read MoreрдердХрд┐рдд рдХрд░реНрдЬрджрд╛рд░рд╛рдВрдиреА рдПрдХрд░рдХреНрдХрдореА рдкрд░рддрд╛рд╡рд╛ рдпреЛрдЬрдиреЗрдЪрд╛ рд▓рд╛рдн рдШреНрдпрд╛рд╡рд╛
Posted by Ramchandra Bari | Apr 27, 2023 | рдЗрддрд░ |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, नंदुरबार कार्यालयामार्फत विविध योजनेतंर्गत व्यवसायाकरीता कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांस व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्यासाठी एकररक्कमी परतावा (ओटीएस) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत थकीत कर्जदारांना 31 मार्च 2024 पर्यंत थकीत कर्ज भरुन योजनेचा लाभ घेता येईल. तरी जिल्ह्यातील थकीत लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतरमागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,नंदुरबार जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार ( दूरध्वनी क्रमांक 02564-210062 येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले...
Read MoreрдЗрдВрдЧреНрд░рдЬреА рдорд╛рдзреНрдпрдорд╛рдЪреНрдпрд╛ рдирд┐рд╡рд╛рд╕реА рд╢рд╛рд│реЗрдд рдкреНрд░рд╡реЗрд╢рд╛рд╕рд╛рдареА рдЕрд░реНрдЬ рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреЗ рдЖрд╡рд╛рд╣рди
Posted by Ramchandra Bari | Apr 27, 2023 | рд╢рд╛рд╕рдХреАрдп, рд╢реИрдХреНрд╖рдгрд┐рдХ |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या नंदुरबार, नवापूर व शहादा या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2023-2024 या शैक्षणिक वर्षांत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, ठाणेपाडा जि.नंदुरबार या निवासी शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वितरित करण्यात येत आहे. प्रवेश अर्ज 29 एप्रिल, 2023 ते 5 मे, 2023 या कालावधीत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, ठाणेपाडा ता.जि.नंदुरबार ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत मिळतील. परीपुर्ण भरलेले प्रवेश अर्ज 5 मे 2023 पर्यंत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, ठाणेपाडा जि.नंदुरबार येथे स्विकारण्यात येतील त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पालक किंवा विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत, दारिद्र्यरेषेच्या दाखल्याची सत्यप्रत, दिव्यांग असल्यास सक्षम दाखला जोडावा. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्य प्रमाणपत्राची प्रत जोडावी. विद्यार्थ्याचे पालक शासकीय,निमशासकीय सेवेत नसल्याबाबत हमीपत्र जोडावे. महिला पालक विधवा,घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्यू प्रमाणपत्र, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म 1 जुलै,2016 ते 31 डिसेंबर,2017 या दरम्यान झालेला असावा. अर्जासोबत 2 पासपोर्ट फोटो आणि जन्म तारखेचा पुरावा म्हणुन ग्रामसेवक, नगरपालिका यांचा दाखला जोडावा. अर्जासोबत विद्यार्थ्याचे, वडीलांचे व आईचे आधार कार्डची साक्षांकित प्रत जोडावी. विद्यार्थी व पालक यांच्यावर या अटी शर्ती व नियम बंधनकारक राहतील. कागदपत्राची अपुर्णता असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा,ठाणेपाडा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले...
Read More