नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  शहादा तालुक्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील 35 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 11 डिसेंबर 2020 रोजी सकाळी ठिक 11 वाजता मोहिदा रोड येथील नवीन तहसील कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात काढण्यात येणार आहे.

 सरपंच पद वेगवेगळ्या प्रवर्गासाठी 5 वर्षाकरिता (एप्रिल 2020 ते मार्च 2025) गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी आरक्षित करुन संख्या निश्चित करण्यात आली आहे.

कोविड-19 परिस्थितीबाबत घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक नियमावली पाळून आरक्षण सोडत कार्यक्रम पार  पाडण्यात येणार आहे.  सभागृहात प्रवेशासाठी मास्क परिधान करणे बंधनकारक असून त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. संबंधित नागरिकांनी नियोजित स्थळी 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे, असे तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांनी कळविले आहे.