नंदुरबार (जगदीश ठाकुर)-
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी यांची निवड झाली आहे. या निवड प्रक्रियेत मतदान झाल्याने शिवसेनेचे राम रघुवंशी यांना 30 मते तर त्यांचे  प्रतिस्पर्धी भाजपाच्या ज्योती पाटील यांना 26 मते मिळाली आहेत त्यामुळे उपाध्यक्षपदी राम रघुवंशी यांची वर्णी लागली आहे