नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : 1 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त केंद्र शासनाकडून एकात्मिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वयोवृध्दांसाठी कामकरणाऱ्या व्यक्ती व संस्थाना वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील वयोवृध्दांसाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या नोंदणीकृत संस्था, व्यक्तींनी अर्ज सादर करावे असे आवाहन आयुक्त, समाज कल्याण नंदुरबार यांनी केले आहे.
संस्था व व्यक्तींनी आपले प्रस्ताव टंकलेखीत करुन सॉफ्ट कॉपीसह 26 मार्च 2021 पर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड नंदुरबार येथे सादर करावे. पुरस्कारा विषयी अधिक माहिती केंद्रशासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या http://socialjustice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.