नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी  तुकडोजी महाराज यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   यावेळी तहसिलदार उल्हास देवरे, नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी, चंद्रकांत महाजन, विजय ससे, हिरालाल घुले, आर. एन. कोळी, आनंदा महाजन आदी उपस्थित होते.