नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध विक्रीसाठी जिल्ह्यातील महिला बचत गट, स्वयंसेवी संस्थां, दुकानदार, व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, ठोक विक्रेते, व किरकोळ विक्रेते यांनी महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयात नांव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालयामार्फत मधुबन हनी ब्रॅण्ड अंतर्गत 100 टक्के शुध्द व ऑरगॅनिक मध तयार केले जात असून सदर मध विक्रीसाठी जिल्ह्यातील वितरक म्हणुन नेमणुक करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती मान्य असल्याबाबतचा सामंजस्य करारनामा रुपये 100 च्या स्टॅंम्पपेपरवर मंडळाचे विहित नमुन्यात करून देणे आवश्यक आहे.
वितरक ठोक विक्रेते यांना 25 टक्के कमिशन व किरकोळ विक्रेते यांना 20 टक्के कमिशन मंडळामार्फत देण्यात येईल. या संधीचा फायदा जिल्ह्यातील महिला बचत गट, स्वयंसेवी संस्थां, दुकानदार, व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, ठोक विक्रेते, व किरकोळ विक्रेते यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. 5, महाबळेश्वर जि. सातारा पिनकोड 412 806 या कार्यालयाच्या 02168-260264 दूरध्वनी क्रमांकावर तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, प्रशासकीय ईमारत जिल्हाधिकारी कार्यालय गाळा क्र. 222, नंदुरबार या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02564-210053 क्रमांकावर किंवा मध प्रशिक्षित कर्मचारी योगेश बदान यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9379965964 यावर संपर्क साधावा असेही श्री. चाटी यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.