नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा अंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी पात्र महिला उमेदवारांकडून 31 मे 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

तळवे क्रं-3-1, तळवे क्रं-2-1, जामोनीपाडा-1, सावर-1 येथील 4 अंगणवाडी सेविका रिक्तपदासाठी तर गोडाटेंबा-1, हांडबा-1, मोड पु-1, बोरीपाडा-1 अशा 4 अंगणवाडी मिनी सेविका रिक्तपदासाठी तसेच कढेल-1, खर्डी खु-1, मोदलपाडा-1, नळगव्हाण-1, केलवापाणी-1, लाखापूर रे-1 अंगणवाडी केंद्रातील 6 मदतनीस अशा एकूण 14  रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

अंगणवाडी सेविका,मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी  केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. तसेच परिपुर्ण भरलेले अर्ज 31 मे 2022 पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा, ता.तळोदा.जि.नंदुरबार येथे सादर करावे. असे रणजित कुऱ्हे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तळोदा यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.