नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार 22 जून 2021 रोजी असली ता. धडगांव येथे राखीव. बुधवार 23 जून 2021 रोजी नंदुरबार येथे राखीव. गुरुवार 24 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता नंदुरबारहून शहादाकडे प्रयाण. दुपारी 12.45 वाजता शासकीय आश्रमशाळा शहादा येथे खावटी अनुदान पात्र लाभार्थ्यांना किट वाटप. दुपारी 1 वाजता शहादा शहर व तालुका काँग्रेस कमेटीची आढावा बैठक. दुपारी 3 वाजता शहादा येथून नंदुरबारकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता नंदुरबार येथे आगमन व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोविड स्थितीची पाहणी. दुपारी 4-30 वाजता नंदुरबार जिल्हा  काँग्रेस कमिटीची पदाधिकारी यांचे समवेत बैठक (स्थळ श्री छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर नंदुरबार ) सायंकाळी 5.30 वाजता जिल्हा क्रिडा संकुल नंदुरबार येथे खावटी अनुदान पात्र लाभार्थ्यांना किट वाटप. सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 6.30 वाजता पत्रकार परिषद व नंदुरबार येथे मुक्काम.

शुक्रवार 25 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता नंदुरबार येथून तोरणमाळकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता शासकीय आश्रमशाळा तोरणमाळ येथे खावटी अनुदान पात्र लाभार्थ्यांना किट वाटप. दुपारी 3 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र  झापी ता.धडगांव येथील नुतन इमारतीचे लोकार्पण. असली ता.धडगाव येथे मुक्काम.

शनिवार 26 जून 2021 रोजी दुपारी 1 वाजता असली ता.धडगाव येथून मोलगी ता.अक्कलकुवाकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता मोलगी ता.अक्कलकुवा येथे खावटी अनुदान पात्र लाभार्थ्यांना किट वाटप. दुपारी 3.30 वाजता असली ता.धडगांवकडे प्रयाण व मुक्काम.

रविवार 27 जून 2021 रोजी नंदुरबार येथे राखीव. सोमवार 28 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता नंदुरबार येथून सुरवाणी ता.धडगांकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता सुरवाणी ता.धडगाव येथे खावटी अनुदान पात्र लाभार्थ्यांना किट वाटप. दुपारी 3 वाजता नंदुरबारकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता नंदुरबार येथून नाशिकमार्गे मुंबईकडे प्रयाण.