नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  लघू पाटबंधारे योजना चिरडा ता.शहादा पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 121 मीटरची नोंद झाली असून  प्रकल्प 100 पूर्ण क्षमतेने भरल्याने तसेच लघु पाटबंधारे योजना, देवळीपाडा ता.नवापूर पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी  96.80 मीटरची नोंद झाली असून हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने उमरी नदीनाल्या काठावरील चिरडा, पिंप्राणे, तलावडी, मडकाणी, आमोदा, फत्तेपूर गावातील तसेच देवळीपाडा,चितवी,केळी नाल्याकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

  नदी व नाला काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.