नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 7 फेब्रुवारी 2022 रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित न करता ई-मेल अथवा व्हॉट्सॲप वर प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यात येणार आहे.

 लोकशाही दिनात अर्ज करावयाचा असल्यास अर्जदारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता आपले तक्रार अर्ज [email protected]  या ईमेलवर किंवा 9403644685 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठविण्यात यावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले आहे.