नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : धडगाव तालुक्यातील असली येथे झालेल्या कोरोना  लसीकरण शिबिरात 45 वर्ष वयोगटातील 73 नागरिकांना लस देण्यात आली. गावात आतापर्यंत 185 व्यक्तींचे  लसीकरण करण्यात आले.

शिबिरात असली ग्रामपंचायतीच्या पंचायत समिती सदस्या गीता चांद्या पाडवी यांनी ग्रामस्थांना लसीकरणाबद्दल असलेले गैरसमज दूर करुन लसीकरणाचे महत्व समजावून सांगितले. गावात गेल्या काही दिवसापासून लसीकरणाबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे या शिबिराला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

शिबिराला वैद्यकीय अधिकारी डॉ.ललित क्षिरसागर, चांद्या बाबा पाडवी, डॉ.ए.एस.पाटील, पोलीस निरीक्षक जी.आर.अवताळे, ग्रामसेवक विवेक नागरे, तलाठी बारक्या पाडवी, उपसरपंच मोतीराम वळवी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका आणि शिक्षक आदी उपस्थित होते.

नर्मदा काठावरील भादल व सादरी येथे लसीकरण

धडगाव तालुक्यातील नर्मदा नदीच्या काठावरील भादल व सादरी या गावांमध्ये मंगळवारी लसीकरण शिबिराचे आयोजित करण्यात आले. शिबिरास तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रावले, आर.जे ब्राम्हणे, आरोग्य सेवक पी.आर. विसपुते, आर. राऊळ, आरोग्य सेविका एस. व्ही राठोड, भादलचे पोलिस पाटील हुमा पावरा, सादरीचे पोलिस पाटील अंबालाल पावरा, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आदी  उपस्थित होते.